मुंबई : टांझानियनमधील किली पॉल हा त्यांच्या इंटरनेटवरील रिल्समुळे फार प्रसिद्ध झाला आहे. सोशल मीडियावर तो फार सक्रिय असतो. याशिवाय त्याची सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोअर्स आहे. त्याचे व्हिडिओ अनेकदा इंटरनेटवर धुमाकुळ घालत असतात, एवढेच नाही तर तो इंस्टाग्रामचा प्रसिद्ध स्टार देखील आहे. इंस्टाग्रामवर त्याचे ५.२ मिलियन फॉलोअर्स आहेत. किली पॉलचा इंटरनेटवरील एक व्हिडिओ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. हा व्हिडिओ किलीने आता शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांच्यासोबत भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर देखील दिसत आहेत.
किली पॉल व्हिडिओ केला पोस्ट : सोशल मीडियावर आपल्या व्हिडीओने खळबळ माजवणाऱ्या किली पॉलने मंगळवारी बहीण नीमा पॉलसोबत एक व्हिडिओ अपलोड केला, ज्याचे कॅप्शन त्याने असे लिहिले आहे की, 'भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांच्याशी बोलून खूप छान वाटले. खूप आभार आणि कृतज्ञता. दरम्यान या व्हिडिओमध्ये, किली पॉलला परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांच्याशी बोलताना पाहता येईल. तसेच या व्हिडिओमध्ये मंत्र्यांचा सहाय्यक किली पॉलला विचारतो, 'तुम्हाला कोणत्या भाषा समजतात हे आमच्या मंत्र्याला जाणून घ्यायचे आहे.' ज्यावर किली पॉल म्हणतो, 'काही भाषा जसे की फ्रेंच, जर्मन, स्पॅनिश. हळूहळू हिंदी देखील. किलीने हिंदी भाषा म्हटल्यानंतर लोक त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
यूजरनी केला प्रेमाचा वर्षाव : किली पॉलच्या या पोस्टवर अनेक कमेंट्स आल्या आहेत. हिंदी भाषा बोलल्याबद्दल लोकांनी त्यांचे कौतुक केले आहे. एका यूजरने लाल हृदयाच्या इमोजीसह त्याच्यासाठी लिहिले, 'थोडेसे हिंदी. हे पुरेसे आहे, बाकीचेही शिकाल. आपला भारत खूप सुंदर आहे. दरम्यान दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की, 'थोडी हिंदीमुळे तुम्ही सर्व भारतीयांची मने जिंकली आहेत.' तर आणखी एका यूजरने लिहले, याचे व्हिडिओ फार सुंदर असतात, तुझा अभिमान आहे मित्रा. त्याच्या या पोस्टवर इतर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे. तसेच भारतात आल्यावर त्यांचे चांगल्या रित्या स्वागत करण्यात आले होते.
हेही वाचा :