ETV Bharat / entertainment

Tamannaah Bhatia And Vijay Varma : विजय वर्मासाठी तमन्ना भाटिया बनली फोटोग्राफर ; इव्हेंटमधला व्हिडिओ झाला व्हायरल... - तमन्ना भाटिया बनली फोटोग्राफर

Tamannaah Bhatia And Vijay Varma : अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा शुक्रवारी रात्री मुंबईत एका फॅशन गालामध्ये सहभागी झाले होते. या इव्हेंटमधील एका व्हिडिओमध्ये तमन्ना ही बॉयफ्रेंड विजय वर्माचा फोटो क्लिक करताना दिसत आहे.

Tamannaah Bhatia And Vijay Varma
तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 9, 2023, 12:50 PM IST

Updated : Sep 9, 2023, 2:01 PM IST

मुंबई - Tamannaah Bhatia And Vijay Varma : साऊथ अभिनेत्री तमन्ना भाटिया सध्या तिच्या नात्यामुळे खूप चर्चेत असते. तमन्ना ही बॉयफ्रेड विजय वर्मासोबत अनेक ठिकाणी स्पॉट होते. 'लस्ट स्टोरी 2' या चित्रपटात ही जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसली होती. या चित्रपटात दोघांनी इंटिमेट सीन दिले होते. त्यानंतर त्याच्या अफेयरच्या चर्चा सोशल मीडियावर होऊ लागल्या. त्यांनी आपल्या प्रेमाची कबूली देखील दिली. दरम्यान आता तमन्ना ही नुकतीच मालदीवच्या सुट्टीवरून परतली आहे. विजय देखील तिच्यासोबत मालदीवला गेला असल्याचं बोललं जात आहे, मात्र या जोडप्यानं एकही सोबतचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलेला नाही.

तमन्ना आणि विजय दिसले एकत्र : अनेकदा या जोडप्याला मुंबईच्या रस्त्यावर चित्रपट आणि डिनर डेटवर जात असताना पाहिले आहे. दरम्यान आता काल रात्री हे लव्हबर्ड्स पुन्हा एकदा एका इव्हेंटमध्ये एकत्र दिसले. या कार्यक्रमात तमन्ना ही तिच्या बॉयफ्रेंड विजय वर्माचे फोटो फोनवर काढताना दिसली. या कार्यक्रमात तमन्ना आणि विजयचा लूक खास दिसत होता. तमन्नाच्या दिलखेचक लूकने तिच्या चाहत्यांना घायाळ केलं नसतं तरच नवल! तमन्नानं या कार्यक्रमात पर्पल कलरच्या बॅकलेस ड्रेस परिधान केला होता. यावर तिने खूप खास शार्प मेक केला असून केस ही मोकळे सोडले होते. विजय वर्माच्या पोशाखाबद्दल बोलायचं झालं तर, त्यानं या इव्हेंटमध्ये काळ्या रंगाचा बहुरंगी स्पार्क लाइनिंगचा सूट घातला होता. यावर त्यानं एक सनग्लास लावला होता. या लूकमध्ये तो खूप खास दिसत होता.

तमन्ना आणि विजयच्या पोस्ट आल्या चाहत्यांच्या कमेंट : सोशल मीडिया तमन्ना आणि विजयचे या कार्यक्रममधील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चाहते या पोस्टवर खूप कमेंट करत आहे. या पोस्टवर कमेंट करत एका चाहत्याने लिहले, 'लग्न निश्चित झाले आहे'. दुसऱ्या चाहत्याने लिहिलंय 'दोघेही एकत्र खूप खास दिसत आहे'. तर आणखी एका चाहत्याने कॉमेंट केलीय, 'लग्न कधी करणार आहात?' अशा अनेक कमेंटस्, विचारणा या व्हिडिओवर होत आहेत. यासह या पोस्टवर अनेकजण फायर आणि हार्ट इमोजी देखील पोस्ट करतायत. आता नुकतीच तमन्ना ही 'जेलर' या चित्रपटामध्ये दिसली होती. तर आता विजय वर्मा हा 'जाने जान' या चित्रपटात करीना कपूर खानसोबत झळकणार आहे. हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा :

  1. Mahesh Babu reviews Jawan : साउथ सुपरस्टार महेश बाबूनं पाहिला 'जवान'; शाहरुखचं केलं कौतुक...
  2. G Marimuthus death : 'जेलर' अभिनेत्याच्या मृत्यूनं रजनीकांतला धक्का; मरिमुथुच्या छातीत दुखत असल्याचा व्हिडिओ व्हायरल
  3. Asha Bhosle Birthday : चिरतरुण आवाजाच्या सदाबहार गायिका आशा भोसलेंचा वाढदिवस; गाण्यांच्या जादूनं जिंकलं जग...

Last Updated : Sep 9, 2023, 2:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.