मुंबई : बॉलीवूड आणि साऊथ चित्रपटांमध्ये सक्रिय असलेली अभिनेत्री तमन्ना भाटियाचा एक आयटम नंबर कावला हे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. या गाण्यात तिच्यासोबत रजनीकांत देखील आहे. हे गाणे रजनीकांत यांच्या आगामी 'जेलर' या चित्रपटातील आहे. या गाण्यात तमन्ना भाटिया फारच उत्तम डान्स केला आहे. आता तमन्नाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या गाण्यावरचा एक रील तयार करून पोस्ट केला आहे. या रीलमध्ये तमन्ना फारच सुंदर दिसत आहे. तमन्नाचा हा रील सोशल मीडियावर फार चाहते पाहत आहे. या रीलवर अनेक चाहत्यांनी फायर इमोजी पोस्ट केले आहेत. सध्याला तमन्नाच्या या कावला गाण्याच्या रीलवरील लाईक्सची संख्या वाढत आहे. ही रील पाहिल्यानंतर तुमचे हृदयही वेगाने धडधडणार आहे हे नक्की.
पोस्टमध्ये लिहले : तमन्ना भाटियाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर रील शेअर करत लिहिले, 'जर तुम्ही अजून ही हुक स्टेप केली नसेल, तर पुन्हा एकदा तुमच्यासाठी आहे... दरम्यान, या रीलमध्ये तिने फारच सुंदर डान्स केला आहे. या रीमध्ये ती फार हटके दिसत आहे.
तमन्ना डान्सने आग लावली : आता चाहते तमन्नाच्या या हॉट रीलचा आस्वाद घेत आहेत आणि कमेंट करून लाईक बटण दाबत आहेत. या रीलवर बहुतेक चाहत्यांनी फायर इमोजी पोस्ट केले आहेत. तमन्नाचे चाहते तिच्या या रीलला आगीचे नाव देत आहेत.
जेलर बद्दल : रजनीकांत स्टारर अॅक्शन कॉमेडी तमिळ चित्रपट 'जेलर' १० ऑगस्टला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नेल्सन दिलीप कुमार यांनी केले आहे. तसेच या चित्रपटात रजनीकांत आणि तमन्ना व्यतिरिक्त मोहनलाल, शिव राजकुमार, रम्या कृष्णन, जॅकी श्रॉफ, योगी बाबू आणि इतर कलाकरही प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. मल्याळम सुपरस्टार मोहनलालची या चित्रपटात खास भूमिका असणार आहे.
जेलर या चित्रपटाची कहाणी : 'जेलर' या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. या अॅक्शन थ्रिलर चित्रपटामध्ये रजनीकांत एका मिशनवर असलेल्या जेलरच्या भूमिकेत दिसणार आहे.
हेही वाचा :