ETV Bharat / entertainment

Khufiya trailer out : तब्बू आणि अली फजल स्टारर 'खुफिया'चा ट्रेलर झाला प्रदर्शित... - खुफिया चित्रपट

Khufiya trailer out : 'खुफिया'चा ट्रेलर नेटफ्लिक्स इंडियानं प्रदर्शित केला आहे. या ट्रेलरला चाहते खूप पसंत करत असून या चित्रपटामधील स्टारकास्टचे खूप कौतुक सोशल मीडियाद्वारे केले जात आहे.

Khufiya trailer out
खुफियाचा ट्रेलर रिलीज
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 18, 2023, 3:31 PM IST

मुंबई - Khufiya trailer out : विशाल भारद्वाज दिग्दर्शित 'खुफिया'चा धमाकेदार ट्रेलर नेटफ्लिक्स इंडियानं प्रदर्शित केला आहे. हा स्पाय थ्रिलर चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर दिसणार आहे. सध्या या चित्रपटाचा ट्रेलर हा सोशल मीडियावर गाजत आहे. या चित्रपटात तब्बू आणि अली फजल दमदार भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट 5 ऑक्टोबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल. टीझरनंतर, ट्रेलरसाठी चाहते आणखीनच उत्साहित झाले होते. 'खुफिया'मध्ये तब्बू कृष्णा मेहराची भूमिका साकारताना दिसत आहे, जी 'रॉ'साठी एजंट म्हणून काम करते. दुसरीकडे, अली फजल देव मेहराच्या भूमिकेत दिसत आहे. त्यावर देशद्रोही असल्याचा आरोप आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

सत्य घटनेवर आधारित 'खुफिया' : 'एस्केप टू नोव्हेअर' नावाच्या पुस्तकावर 'खुफिया' आधारित आहे. ट्रेलरची सुरुवात 'रॉ'च्या ऑफिसपासून होते. या ट्रेलरमध्ये तब्बू ही एका धोकादायक मोहिमेवर आहे. देशाच्या विरोधात जाणारा 'रॉ'मध्ये गद्दार कोण असू शकतो, हे शोधण्याचा प्रयत्न ती करत आहे. तब्बूचा संशय अली फजलच्या व्यक्तिरेखेवर येतो. या चित्रपटाचा ट्रेलर हा चाहत्यांना खूप आवडत आहे. 'खुफिया' चित्रपटाच्या पोस्टवर अनेक चाहते कमेंट करत आहेत. एका चाहत्यांन कमेंट करत लिहलं, 'विशाल भारद्वाज आणि तब्बू हे डेडली कॉम्बो आहेत' दुसऱ्या चाहत्यानं लिहलं, असे चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाले पाहिजेत. ही एक परिपूर्ण कलाकृती आहे'. आणखी एका चाहत्यानं लिहिलं, 'विशाल भारद्वाज सरांची आणखी एक कलाकृती, अशा अनेक कमेंट या पोस्टवर येत आहेत.

विशाल भारद्वाज उत्साह केला व्यक्त : दिग्दर्शक विशाल भारद्वाजनं मीडियाशी बोलताना सांगितलं, 'मला 'रॉ'च्या जगानं नेहमीच भुरळ घातली आहे. 'खुफिया'सोबत या शैलीचा शोध घेण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. या चित्रपटामुळं मला तब्बूसोबत पुन्हा एकत्र येण्याची संधी मिळाली. याशिवाय अली फजल आणि वामिका गब्बी या दोन अतिशय प्रतिभावान कलाकारांसोबत काम करायला मिळलं यासाठी मी खूश आहे. हे नेटफ्लिक्ससह माझे पहिले सर्जनशील सहकार्य देखील चिन्हांकित करते. ते रोमांचक आणि फायद्याचे आहे. मी ही कहाणी प्रेक्षकांसोबत शेअर केल्याशिवाय थांबू शकत नाही, असं विशाल यांनी म्हटलं.

हेही वाचा :

  1. Animal Teaser: रणबीर कपूर स्टारर 'अ‍ॅनिमल' चित्रपटाची टीझर रिलीज डेट आली समोर...
  2. Nayanthara : नयनतारानं पती विघ्नेश शिवनसह स्विमिंग पूलमध्ये केला एन्जॉय ; फोटो झाला व्हायरल...
  3. Jawan box office collection day 12 : शाहरुख खानचा 'जवान' जगभरात करत आहे धूम...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.