ETV Bharat / entertainment

Swiggy delivery boys : शाहरुखसाठी जेवण घेऊन मन्नतवर पोहोचली स्विग्गी डिलिव्हरी टीम, का ते वाचा.. - Mannat with dinner for SRK

शाहरुख खान हा खऱ्या अर्थाने किंग खान आहे. त्याने मनात एखादी गोष्ट आणावी आणि ती लगेच पूर्ण व्हावी असा त्याचा थाट असतो. ट्विटरवरील प्रश्नोत्तराच्या दरम्यान एका चाहत्याने त्याला जेवलास का? विचारले असता त्याने, 'तू काय स्विगीवाला आहेस का ? आणि जेवण घेऊन येणार आहेस का?' विचारले आणि गंमत म्हणजे स्विग्गी टीम त्याच्या मन्नत बंगल्याबाहेर जेवण घेऊन पोहोचली.

Swiggy delivery boys
शाहरुख खान हा खऱ्या अर्थाने किंग खान
author img

By

Published : Jun 13, 2023, 5:34 PM IST

मुंबई - बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानसाठी मन्नत बंगल्याबाहेर स्विग्गीचे फूड डिलिव्हरी बॉय पोहोचल्याने सोशल मीडियात खळबळ उडाली. शाहरुखने जेवणासाठी काय ऑर्डर केले असे इथं पासून अनेक चर्चा झडू लागल्या. स्विगी डिलीव्हरी बॉइजचा हा फोटो व्हायरल होण्यामागचे कारण फारच इंटरेस्टिंग आहे.

आस्क एसआरके सेशनमध्ये शाहरुख- शाहरुख खानने आपल्या चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी आस्क एसआरके सेशन आयोजित केले होते. बरेच चाहते त्याला प्रश्न विचारत होते आणि त्यांना तो दिलखुलास उत्तरेही देत होता.

शाहरुखच्या बंगल्याबाहेर स्विग्गी टीम - ट्विटरवर रंगलेल्या या प्रश्नोत्तर कार्यक्रमात शाहरुखचे जगभरातील चाहत्यांनी त्याच्याशी सिनेमा, खासगी आयुष्य, कुटुंब यासह दैनंदिन धमाकेदार विषयांसह विविध विषयांवर चर्चा केली. या दरम्यान एका चाहत्याने शाहरुखला जेवलास का असे विचारले. यावर मिश्कील आणि हजरजबाबी शाहरुखने त्याला विचारले, क्यों भाई आप स्विगी से हो क्या ? ....भेज दोगे क्या? असे विचारले. या चर्चेमध्ये थेट फूड डिलिव्हरी अॅपने उडी मारली आणि एसआरकेला ऑफर दिली. काही तासांत स्विगी कर्मचार्‍यांचा एक गट मन्नत येथे पोहोचला आणि त्यांनी ट्विटर पोस्टमध्ये सांगितले की ते डिनर घेऊन आले आहेत. शाहरुखच्या बंगल्याबाहेरील एक फोटो शेअर करत त्यांनी लिहिले: 'हम स्विगी वाले है और हम डिनर लेके आगये[' शाहरुखच्या ब्लॉकबस्टर चित्रपट दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे या चित्रपटातील एका प्रसंगाची सांगड घालत स्विगीच्या डिजिटल टीमने एक संधी शोधली आणि चमकण्याची संधी मिळवली.

आस्क मी एनीथिंग सत्रादरम्यान एसआरकेने त्याच्या आगामी चित्रपटांबद्दल तसेच त्याची मुलगी सुहाना खानचा पहिला चित्रप द आर्चीज याविषयीच्या प्रश्नांनाही उत्तरे दिली. आपल्या मुलीच्या पहिल्या चित्रपटाबद्दल असलेला अभिमान यावेळी शाहरुखने बोलून दाखवला. शाहरुख खान सध्या जवान आणि डंकी या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत आहे. शाहरुख खान, नयनतारा, विजय सेतुपती, सान्या मल्होत्रा आणि प्रियामणी यांच्या प्रमुख भूमिका असलेला जवान ७ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा -

१. The Archies Gang : सुहाना खान आणि अगस्त्य नंदासह द आर्चिस टीम नेटफ्लिक्स इव्हेंटसाठी ब्राझीलला रवाना

२. Success Bash Of Zara Hatke Zara Bachke : जरा हटके जरा बचकेच्या सक्सेस पार्टीत सेलेब्रिटींची मांदियाळी

३. Karan Deol Pre Wedding : सनी देओलचा मुलगा करणच्या विवाहपूर्व उत्सवासाठी देओल कुटुंब एकत्र

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.