ETV Bharat / entertainment

Post written by Swara Bhaskar : 'ती गाझामध्ये जन्मली असती तर..', मुलीसाठी स्वरा भास्करनं लिहिलं पोस्ट

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 21, 2023, 5:46 PM IST

Post written by Swara Bhaskar : स्वरा भास्करनं आई म्हणू एक सुंदर भावनिक पोस्ट लिहिली आहे. गाझापट्टीत मारल्या जात असलेल्या मुलांना पाहून तिला वाटतं की, आपली मुलगी गाझात जन्मली असती तर. या वेदना आणि मृत्यूचं थैमान हे जग रोखू शकणार नाही म्हणून तिनं ऐकू शकेल अशा देवाकडे प्रार्थना केली आहे.

Post written by Swara Bhaskar
स्वरा भास्करनं लिहिलं पोस्ट

मुंबई - Post written by Swara Bhaskar : अभिनेत्री स्वरा भास्करनं नुकतीच मातृत्वाच्या जगात प्रवेश केला आहे. गेल्या महिन्यात तिनं एका गोड मुलाला जन्म दिला. आपल्या मुलीवरचं प्रेम व्यक्त करताना एका सोशल मीडिया पोस्टमध्ये तिचं हृदय गाझा पट्टीत होत असलेल्या युद्धाच्या वेदनादायी बातम्यांमुळे कळवळलंय. गाझामध्ये दररोज मारल्या जाणाऱ्या मुलांच्या धक्कादायक आठवणीनं तिचा जीव गलबलून गेलाय. आपल्या मुलीच्या बाबतीत विचार करताना तिनं लिहिलंय, 'जर ती गाझामध्ये जन्मली असती तर.' असं जर घडलं असतं तर ती आपल्या मुलीच्या संरक्षणासाठी काय करु शकली असती, या कल्पनेनंच ती हादरुन गेलीय.

स्वराने तिच्या जवळपास एक महिन्याच्या मुलीसोबत इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आणि लिहिले, 'कोणतीही नवीन आई आपल्या नवजात बालकाकडे तृप्ती, शांती आणि आनंदाच्या भावनेनं तासंतास बघत राहू शकते. मीही याहून वेगळी नाही. जगभरातील मातांची हीच भावना असेल याची मला खात्री आहे. जेव्हा आपण आपल्या मुलाकडे पाहतो तेव्हा या भयानक विचारांनी आपण प्रभावित होतो आणि याकडं दुर्लक्ष करणं कठिण आहे.'

'मी माझ्या शांत झोपलेल्या बाळाकडे पाहात राहिले की ती गाझामध्ये जन्मली असती तर मी तिचं रक्षण करु शकले असते का, असा विचार येतो आणि ती अशा परिस्थितीत कधीही सापडू नये अशी प्रार्थना करते. ती कोणता आशीर्वाद आणि कोणता शाप घेऊन जन्मली आहे, असा विचार करत राहते. ती गाझामध्ये जन्मलेली मुलं बंदिस्त आकाशाखाली दररोज मारली जात आहेत.', असं तिनं पुढं लिहिलंय.

'आम्ही ज्या अस्ताव्यस्त दुष्ट आणि नैतिक अधोगतीमध्ये आहोत ते अथांग आहे! रुग्णालयं, आश्रयस्थानं आणि चर्चमधील मुलांवर बॉम्ब टाकणं आणि त्याला जगातील प्रमुख शक्तींनी दिलेला परवाना हे आपण कोणत्या काळोख्या आणि अन्यायकारक काळात जगतोय हे सूचित करतं. जो ऐकत असेल त्या देवाला प्रार्थना करते की, त्यानं गाझात मुलांना होणाऱ्या वेदना आणि मृत्यूपासून वाचवावं. कारण त्यांचं संरक्षण हे जग करु शकणार नाही', असं तिन पुढं म्हटलंय. स्वरा भास्कर आणि तिचा पती फहाद अहमद यांनी गेल्या महिन्यात 23 सप्टेंबर रोजी मुलगी झाली. तिचं नाव त्यांनी राबिया असं ठेवलंय.

हेही वाचा -

1. Tiger 3 New Song : 'लेके प्रभु का नाम' गाण्यातील कतरिनाच्या लूकवर सलमान खान फिदा...

2. Leo Box Office Collection Day 3: विजय 'थलपथीच्या 'लिओ'नं बॉक्स ऑफिसवर केलं वादळ निर्माण...

3. Suhana Khans song Sunoh : सुहाना खानच्या 'सुनोह' गाण्यातून शाहरुख खानला मिळाला 'प्रेरणा'चा डोस

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.