मुंबई - Gayatri Joshi Car Accident: बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानसोबत स्वदेश या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री गायत्री जोशीचा कार अपघात झाला आहे. हा अपघात जेव्हा झाला, तेव्हा गायत्रीचा पती विकास ओबेरॉयही कारमध्ये उपस्थित होता. इटलीमध्ये झालेल्या या अपघाताचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या अपघातात गायत्री आणि विकास सुखरुप आहेत, मात्र दुसऱ्या कारमध्ये उपस्थित असलेल्या स्विस कारमधील जोडप्याचा जागीच मृत्यू झाला आहे. हा खूप भीषण अपघात झाला आहे. गायत्री ही पती विकास ओबेरॉयसोबत इटलीमध्ये फिरत असताना हा अपघात झाला. गायत्रीची कार इतर वाहनांना आणि कॅम्पर व्हॅनला धडकली.
-
Two deaths on a Ferrari in Sardina, Italy pic.twitter.com/skT3CaXg0T
— Globe Clips (@globeclip) October 3, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Two deaths on a Ferrari in Sardina, Italy pic.twitter.com/skT3CaXg0T
— Globe Clips (@globeclip) October 3, 2023Two deaths on a Ferrari in Sardina, Italy pic.twitter.com/skT3CaXg0T
— Globe Clips (@globeclip) October 3, 2023
अभिनेत्री गायत्री जोशीचा झाला अपघात : या अपघातात जेव्हा फेरारीला टक्कर झाली, तेव्हा आग लागली. अपघाताबाबत माहिती देताना गायत्री सांगितलं, 'आमचा अपघात झाला, तेव्हा विकास आणि मी इटलीला होतो. देवाच्या कृपेने आम्ही दोघंही पूर्णपणे सुखरुप आहोत'. या घटनेविषयी असा दावा केला जात आहे की, ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात लॅम्बोर्गिनी आणि फेरारीची टक्कर झाली, त्यानंतर फेरारी पलटी घेतल्यानं आग लागली. या लॅम्बोर्गिनीमध्ये गायत्रीचा पती होता. या अपघातात ज्या जोडप्यानं जीव गमावला त्यांची नावं मेलिसा क्रौटली, 63, आणि मार्कस क्रौटली, 67 आहेत. हे जोडपं स्वित्झर्लंडमधील आहे.
गायत्रीनं लवकरच चित्रपटसृष्टी सोडली : गायत्री ही 2000 मध्ये फेमिना मिस इंडिया इंटरनॅशनल जिंकली आणि 2004 मध्ये 'स्वदेस' या चित्रपटाद्वारे तिनं चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. या चित्रपटात ती शाहरुख खानसोबत दिसली होती. 'स्वदेस' चित्रपटाचे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर होते. या चित्रपटानं अपेक्षेप्रमाणे फारशी कमाई केली नसली, तरी समीक्षकांकडून खूप प्रशंसा मिळाली आहे. गायत्रीला या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कारही मिळाला होता. गायत्रीनं चित्रपटसृष्टी फार लवकर सोडली. तिनं फक्त एकाच चित्रपटात काम केलं आहे. यानंतर तिनं बिझनेसमन विकास ओबेरॉयसोबत लग्न केलं. ती दोन मुलांची आई आहे. मुंबईतील काही कार्यक्रमांमध्ये गायत्री कधी-कधी सार्वजनिकपणे दिसते.
हेही वाचा :