ETV Bharat / entertainment

Sushmita Sens upcoming web series : सुष्मिता सेनच्या आगामी अ‍ॅक्शन थ्रिलर वेब सीरिज 'आर्या 3'चे शुटिंग पूर्ण - ताली वेब सीरिज

सुष्मिता सेनच्या आगामी अ‍ॅक्शन थ्रिलर वेब सीरिज 'आर्या 3' शुटिंग पूर्ण झाले आहे. त्यानंतर तिने तिच्या इंस्टाग्रामवर सेटवरचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंटचा वर्षाव केला आहे.

Sushmita Sens
सुष्मिता सेन
author img

By

Published : Jun 5, 2023, 3:54 PM IST

मुंबई : अभिनेत्री सुष्मिता सेन, सध्याला तिच्या आगामी अ‍ॅक्शन थ्रिलर वेब सीरिज 'आर्या 3'च्या शूटिंगमध्ये व्यग्र होती. अखेर आर्या 3 या वेब सीरिजची शूटिंग ही पूर्ण झाली आहे. सुष्मिताने रविवारी तिच्या शुटिंग सेटवरचा एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना तिने लिहिले, सर्वात अप्रतिम कलाकार आणि क्रू !!! धन्यवाद सर्वांना घट्ट मिठी. माझे तुमच्यावर प्रेम आहे मित्रानो!!!' अशी पोस्ट लिहून तिने काहीजणांना टॅग केली आहे. तसेच व्हिडिओमध्ये, ती दिग्दर्शक राम माधवानीसोबत डान्स करताना दिसत आहे याशिवाय ती तिचा सहकलाकार सिकंदर खेरला मिठी मारताना दिसत आहे.

आर्या 3 : व्हिडिओ अपलोड होताच या व्हिडिओवर तिच्या चाहत्यांने कमेंटचा वर्षाव केला आहे. तसेच या व्हिडिओवर तिच्या इंडस्ट्रीतील मित्रांनी कमेंट केली आहे. सिकंदरने लिहिले, 'जसे ते म्हणतात.. काँगो टू ऑल ऑल!' तर एका वापरकर्त्याने लिहले, 'सीझन 3 पाहण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही.' तर आणखी एकाने लिहले, 'या वेब सीरिजची आतुरतेने वाट पाहत आहे'. सुष्मिता सेनने डिजिटलमध्ये पदार्पण केल्याने तिचा चाहता वर्ग फार खुश आहे. सुष्मिताने जून 2020 मध्ये 'आर्या' या वेब सीरिजमध्ये काम केले होते. या वेब सीरिजमध्ये ती कठोर महिलेची भूमिका साकारत आहे, जी आपल्या कुटुंबाला गुन्हेगारी जगापासून संरक्षण करण्याच्या प्रयत्नात असते .

ताली वेब सीरिज : या वेब सीरिजच्या पहिल्या सीझनला इंटरनॅशनल एमी अवॉर्ड्समध्ये 'सर्वोत्कृष्ट ड्रामा' मालिकेसाठी नामांकन मिळाले होते. तसेच राम माधवानी दिग्दर्शित, या मालिकेत नमित दास, मनीष चौधरी, सिकंदर खेर आणि विनोद रावत यांच्या प्रमुख भूमिका आहेत. शोचा दुसरा सीझन डिसेंबर २०२१ मध्ये रिलीज झाला होता आणि तिसर्‍या सीझनची रिलीज डेट अद्याप निर्मात्यांनी जाहीर केलेली नाही.ही वेब सीरीज ओटीटी प्लॅटफॉर्म डिज़्नी+ हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. याशिवाय सुष्मिता 'ताली' नावाच्या नवीन वेब सीरिजमध्ये ट्रान्सजेंडर कार्यकर्त्या गौरी सावंतची भूमिका साकारताना दिसणार आहे. लवकरच ही वेब सीरिज प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

हेही वाचा :

  1. Satyaprem Ki Katha trailer: कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणीचा रोमँटिक सत्यप्रेम की कथाचा ट्रेलर रिलीज
  2. Car Accident : मल्याळम अभिनेता कोल्लम सुधी यांचे अपघातात निधन
  3. Ranbir Kapoor: रणबीर कपूरच्या या आगामी चित्रपटाचे व्हिडिओ फुटेज लीक...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.