ETV Bharat / entertainment

Sushmita Sen-Rohman Shawl : सुष्मिता सेन आणि तिचा एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉल पुन्हा येणार एकत्र ? - सुष्मिता सेनच्या एक्स बॉयफ्रेंडने केले तिचे कौतुक

सुष्मिता सेनचा एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉलने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिचे फार कौतुक केले. 2021 मध्ये विभक्त झाल्यानंतर पुन्हा एकदा एकत्र येत असल्याच्या अफवा पसरल्या जात आहे.

Sushmita Sen Rohman Shawl
सुष्मिता सेन आणि रोहमन शॉल
author img

By

Published : Jun 17, 2023, 2:39 PM IST

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन नेहमी चर्चेत असते. आता अलीकडे तिला तिच्या एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉल पाहिल्या गेल्याने त्या दोघांच्या पॅच-अप झाल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. 2021 मध्ये हे दोघे विभक्त झाले होते. या दोघांना अनेक वेळा एकत्र पाहिले गेले आहे ज्यामुळे ते पुन्हा एकत्र येत असल्याच्या अफवा पसरल्या जात आहे. रोहमन, हा लवकरच एका चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रोहमनने सुष्मिताचे फार कौतुक केले आहे.

सुष्मिता सेनच्या एक्स बॉयफ्रेंडने केले तिचे कौतुक : सुष्मिताबद्दल बोलताना, रोहमनने एका मुलाखतीत सांगितले की ती जे काही करते त्यात ती अपवादात्मक आहे आणि तिच्या आसपास राहणे हा एक जबरदस्त शिकण्यासाठीचा अनुभव असतो. 'ती कुठून प्रेरणा घेते हे तुम्ही खरोखरच समजू शकत नाही, तुम्ही फक्त तिच्याभोवती असायला पाहिजे. रोहमन हा सुष्मितापेक्षा 15 लहान आहे. त्यानंतर रोहमन त्यांच्या सहलीबद्दल सांगितले, ज्यामुळे ते पुन्हा डेटिंग करत असल्याच्या अफवा पसरल्या आहे, रोहमन पुढे म्हटले, 'आम्ही एकत्र छान दिसतो. आम्ही लोकांसाठी जगत नाही, त्यामुळे काही फरक पडत नाही. तुम्ही तुमच्या गोष्टी करा, लोकांना काय म्हणायचे आहे, हे त्यांच्यावर अवलंबून आहे. तुम्हाला कुणालाही उत्तर देण्याची गरज नाही. लोक जे काही बोलतात त्यावर आम्ही भाष्य करत नाही. आम्ही आमचे आयुष्य जगतो, तेच आहे.'

सुष्मिता आणि तिचा एक्स बॉयफ्रेंड अनेकदा एकत्र दिसतात : सुष्मितासोबत काम करण्याबाबत विचारले असता, तो म्हणाला, त्या पातळीपर्यंत पोहोचण्यासाठी आणि तिच्यासोबत एका फ्रेममध्ये एकत्र काम करण्यासाठी मला खूप मेहनत करावी लागेल. इंशाअल्लाह मी एक दिवस तिथे पोहोचेन. मला वाटते, जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीवर खरच प्रेम करत असाल. तेव्हा तुम्हाला त्यांच्याबद्दल सर्व काही आवडते. मला ती नेहमीच बुद्धिबळात हरवते आणि मला हरणे खरोखर आवडत नाही.' असे त्याने यावेळी सांगितले. दरम्यान, आयपीएलचे पहिले अध्यक्ष ललित मोदी यांनी जेव्हा सुष्मिता सेनबद्दलच्या नात्याची बातमी उघड केली त्यावेळी सुष्मिता ही फार चर्चेत होती. अलीकडच्या काही महिन्यापुर्वी ती मुंबईतील एका सहलीत आणि कार्यक्रमात रोहमनसोबत दिसली होती.

हेही वाचा :

  1. Adipurush box office Day 1: प्रभास स्टारर आदिपुरुषच्या कमाईची दमदार सुरुवात
  2. Rajasthan Destination Weddings : डेस्टिनेशन वेडिंगसाठी राजस्थान ही सेलेब्रिटी स्टार्सची बनली पहिली पसंती
  3. Tiger Shroff : टायगर श्रॉफने सोशल मीडियावर केला डान्सचा व्हिडिओ शेअर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.