ETV Bharat / entertainment

Cannes 2023 : 'माझा जीव वाचवलास' म्हणत, सनी लिओनने मानले पती डॅनियल वेबरचे आभार - कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023

सनीने अलीकडेच कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023 मध्ये तिच्या रेड कार्पेटवर पदार्पण केले, जिथे ती तिच्या पतीसोबत आली होती. यादम्यान तिने तिच्या पतीसाठी इंन्टाग्रामवर एक गोड पोस्ट केली आहे.

Sunny Leone
सनी लिओन
author img

By

Published : May 29, 2023, 10:47 AM IST

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीने नुकतेच कान्समध्ये पदार्पण केले आणि खूप प्रशंसा मिळवली. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सनी लिओन स्टारर आणि अनुराग कश्यप दिग्दर्शित 'केनेडी' प्रदर्शित झाला, तो पाहिल्यानंतर ज्युरींनी त्याचे कौतुक केले. त्यानंतर सनीने पती डॅनियल वेबरचे त्या प्रसंगी तिच्यासोबत 15 वर्षे सोबत राहिल्याबद्दल आभार मानले आहेत. सनीने कान्स फिल्म फेस्टिव्हलमधील दोन व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. तिच्या पतीसाठी एक गोड पोस्ट लिहली आहे. सनी लिओनीने लिहिले, 'डॅनियल देवाने तुला माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट क्षणी पाठवले. त्या क्षणी तू अक्षरशः माझा जीव वाचवलास आणि तेव्हापासून तू माझ्याबरोबर आहेस. एकतेची 15 वर्षे! कान्सचा हा क्षण तुझ्याशिवाय कधीच शक्य झाला नसता.' सनीने तिच्या पोस्टमध्ये पुढे लिहिले की, 'मला पुढे नेण्यासाठी आणि माझी स्वप्ने पूर्ण करण्यात मला मदत करण्यासाठी आभार तुझी लढाई खरोखरच एका वेगळ्या पातळीवर निस्वार्थीपणाची आहे. मी तुझ्यावर प्रेम करते आणि धन्यवाद. सनीच्या पोस्टवर प्रतिक्रिया देण्यापासून डेनियर स्वतःला रोखू शकला नाही आणि त्याने कमेंट केली, 'तू जे काही मिळवले आहे, ते तू कमावले आहे !!!!! माझ्यासोबत किंवा माझ्याशिवाय मी तुझ्यावर प्रेम करतो, ही फक्त सुरुवात आहे.'व्हिडिओमध्ये ती रेड कार्पेटवर पापाराझीला पोझ देताना आणि तिच्या पतीला किस करताना दिसत आहे. तिने हा व्हिडिओ टाकल्यानंतर लगेच, चाहत्यांनी लाल हृदय आणि फायर इमोटिकॉन्ससह कमेंट केल्या आहे.

इंडस्ट्रीतील पॉवर कपल : सनी लिओन आणि डॅनियल वेबर हे इंडस्ट्रीतील पॉवर कपल आहेत. हे जोडपे अनेकदा एकत्र वेळ घालवताना आणि खास पोस्ट्सद्वारे चाहत्यांना कपल गोल देताना दिसतात. तर, व्हिडिओमध्ये सनी आणि डॅनियल एकमेकांमध्ये हरवलेले दिसत आहेत. चाहत्यांना या जोडप्याचा व्हिडिओ फार पसंती पडला आहे. या पोस्ट अनेकांनी कमेंट करत लिहले, 'एकदम आश्चर्यकारक.' दुसऱ्याने लिहले, 'असे एक मोहक जोडपे'. सनीने दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि अभिनेता राहुल भट यांच्यासह कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये तिच्या 'केनेडी' चित्रपटाच्या प्रीमियरसाठी कान्सला भेट दिली.

सनी यावेळी दिसत होती मोहक : प्रीमियरसाठी सनीने वन-शोल्डर हाय-स्लिट गुलाबी गाऊन परिधान केला होता. ग्लॅमसाठी, तिने तिचे केस स्लीक बनमध्ये बांधले असून हिऱ्याचे झुमके आणि हिल्स घातली होती. तर अनुरागने काळ्या रंगाचा जोधपुरी सूट घातला आणि राहुलने काळ्या रंगाचा टक्सिडो परिधान केला होता. सनी लिओनी आणि डॅनियल वेबर 2011 मध्ये लग्नाच्या बेडीत अडकले. त्यानंतर लगेचच या जोडप्याने महाराष्ट्रातील लातूर येथून मुलगी निशा हिला दत्तक घेतले. नंतर सरोगसीच्या माध्यमातून सनीने दोन जुळ्या मुलांना जन्म दिला.

हेही वाचा : Urvashi Rautela in IFFA 2023 : आयफा 2023 मध्ये ऋषभ पंतबद्दल प्रश्न विचारल्यानंतर उर्वशी रौतेलाची हजर जबाबी प्रतिक्रिया

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.