ETV Bharat / entertainment

Sunny Leone missing girl : बेपत्ता मुलीसाठी सनी लिओनीनं केलं होतं आवाहन, 24 तासात लागला मुलीचा शोध - Sunny Leone latest news

Sunny Leone missing girl : अभिनेत्री सनी लिओनीच्या घरी मदतनीस म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीची 8 नोव्हेंबरला बेपत्ता झाली होती. मुलीच्या शोधासाठी सनीनं 50 हजार रुपये बक्षीस जाहीर केलं होतं. ही मुलगी आता सापडली असल्याचं तिनं सोशल मीडिया पोस्टवरुन कळवलंय.

Sunny Leone missing girl
बेपत्ता मुलीसाठी सनी लिओनीनं केलं होतं आवाहन
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 10, 2023, 10:21 AM IST

मुंबई - Sunny Leone missing girl : सनी लिओनीनं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहून बेपत्ता मुलीच्या शोधासाठी मदत करण्याचं आवाहन केलं होतं. यासाठी तिनं स्वतः 50 हजार रुपये बक्षीस देणार असल्याचंही जाहीर केलं होतं. ही मुलगी आता सापडली असल्याचं तिनं लेटेस्ट पोस्टवरुन कळवलंय.

सनी लिओनीनं सोशल मीडियावर एका मुलीचा फोटो पोस्ट करुन एक लिहिलं होतं, 'ही मुलगी तिच्या घरी कुटुंबामध्ये सुखरूप परतावी यासाठी मी अतिरिक्त 50,000 रुपये देईन. अनुष्का ही माझ्या घरी मदतनीस असलेल्याची 9 वर्षाची मुलगी आहे. ती गेल्या 8 नोव्हेंबरच्या संध्याकाळी 7 वाजल्यापासून जोगेश्वरी पश्चिम बेहराम बाग शेज हाऊस 9 पासून बेपत्ता आहे. या मुलीबद्दल काही समजल्यास तिच्या आई वडीलांकडून 11 हजारची रक्कम रोख देण्यात येईल. कृपया सतर्क राहून या मुलीचा शोध घ्या व तिची आई सरिता किंवा वडील किरण अथवा माझ्याशी संपर्क साधा.' आपल्या पोस्टमध्ये बेपत्ता झालेल्या मुलीच्या आई वडीलांचे फोन क्रमांकही दिले होते.

आता ही मुलगी तिच्या आई वडीलांकडे सुखरुप परत आलीय. ही माहिती सनी लिओननं एक नवी पोस्ट लिहून कळवलीय. तिनं लिहिलंय, 'आमच्या प्रार्थनेला ईश्वरानं प्रतिसाद दिला. इश्वर श्रेष्ठ आहे. देव या कुटुंबाला आशीर्वाद देवो.'

सनीनं कुटुंबाच्या वतीनंही आभार मानताना लिहिलंय, 'मुंबई पोलिसांचे खूप आभार. बेपत्ता झाल्यानंतर 24 तासामध्ये अनुष्का परत मिळाली आहे. पोस्ट शेअर करणाऱ्या व व्हायरल करणाऱ्या सर्व हितचिंतकांचे खूप आभार. प्रत्येकाला हृदयापासून धन्यवाद.'

सनी लिओनी गरजू लोकांना नेहमी मदतीचा हात पुढं करत असते. काही वर्षापूर्वी तिनं एक लहान मुलगी अनाथ आश्रममधून दत्तक घेतली होती. त्या मुलीचं संगोपन ती अतिशय प्रेमानं करत असते. तिनं आपल्या घरी काम करणाऱ्या मदनीसाची गायब झालेली मुलगी परत मिळावी यासाठी खूप मोठी मदत केली आहे. सनीच्या या दोन्ही पोस्ट व्हायरल झाल्या आहेत.

सनी लिओनीच्या कामाचा विचार करता ती अलिकडेच अनुराग कश्यप दिग्दर्शित 'केनेडी' या चित्रपटात झळकली होती. याक्षणी अनेक चित्रपट तिच्या हातात आहेत. लवकरच ती 'रंगीला', 'वीरामादेवी', 'शेरो', 'कोका कोला', 'हेलन' आणि 'द बॅटल ऑफ भीमा कोरेगांव' यासारख्या चित्रपटातून दिसणार आहे.

हेही वाचा -

  1. Parineeti Chopra Maldives Vacation : परिणीती चोप्रानं मालदीवमधील थ्रोबॅक फोटो केले शेअर; पाहा फोटो

2. Shooting Of Pushpa 2 And Salaar : 'पुष्पा 2', 'सालार' चित्रपटांच्या शूटिंगमुळे रामोजी फिल्मसिटी गजबजली

3. Pankaj Tripathi Kadak Singh Look: पंकज त्रिपाठीचा 'कडक सिंग' फर्स्ट लूक प्रदर्शित

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.