मुंबई : 22 वर्षांनंतर तारा सिंह पुन्हा एकदा आपल्या सकीनासोबत मोठ्या पडद्यावर परतणार आहे. होय, 2023 च्या प्रजासत्ताक दिनानिमित्त बॉलिवूड अभिनेता सनी देओलने गदर-2 चे फर्स्ट लूक पोस्टर रिलीज केले आहे. पोस्टर रिलीज होताच सनी देओलच्या लूकने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. सनी देओलने पोस्टर रिलीजसोबतच चित्रपटाची रिलीज डेटही जाहीर केली आहे. अनिल शर्माचा हा चित्रपट यावर्षीच थिएटरमध्ये दाखल होणार आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
फर्स्ट लूक इंस्टाग्रामवर शेअर केला : बॉलिवूड अभिनेता सनी देओलने त्याचा आगामी चित्रपट गदरचा फर्स्ट लूक पोस्टर इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या पोस्टमध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची माहिती देताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'हिंदुस्तान जिंदाबाद है, जिंदाबाद था, और जिंदाबाद रहेगा'. दोन दशकांनंतर आम्ही तुमच्यासाठी भारतीय सिनेमाचा सर्वात मोठा सिक्वेल घेऊन आलो आहोत. गदर-2 11 ऑगस्ट 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे'. सनी देओलच्या चाहत्यांनी या पोस्टरवर आनंद व्यक्त केला आहे आणि चित्रपटाबद्दलची त्यांची उत्सुकता शेअर केली आहे.
सनी देओलचा आक्रमक लुक : चित्रपटाच्या पोस्टरमध्ये सनी देओल कुर्ता-पायजमा आणि पगडी घातलेला दिसत आहे. त्याच्या एका हातात मोठा हातोडाही आहे. पोस्टरमध्ये त्याचा लूक आक्रमक दिसत आहे. सनी देओलचा हा लूक जबरदस्त आहे. त्याचवेळी पोस्टरच्या वर 'हिंदुस्तान झिंदाबाद' असे लिहिले आहे आणि चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख खाली दिली आहे. सनी देओलने 'मां तुझे सलाम', 'भारतीय', 'हीरो', 'गदर एक प्रेम कथा', 'बॉर्डर'सह अनेक देशभक्तीपर चित्रपटांमध्ये काम केले आहे. याशिवाय त्याने 'दामिनी', 'जिद्दी', 'घातक', 'घायल', 'अर्जुन पंडित', 'जल' सारखे अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत.
'गदर' 2001 मध्ये रिलीज झाला होता : 2001 मध्ये रिलीज झालेल्या अनिल शर्मा दिग्दर्शित 'गदर' चित्रपटात सनी देओलसोबत अमिषा पटेल मुख्य भूमिकेत दिसली होती. या चित्रपटात अनिलचा मुलगा उत्कर्ष शर्माने सनी आणि अमिषाच्या मुलाची भूमिका साकारली होती. आता 'गदर 2'मध्ये देखील तीच फॅमिली पुन्हा दिसणार असल्याचे बोलले जात आहे. 'गदर 2' चे कथानक देखील भारत-पाकिस्तानच्या संबंधावर आधारित असून सिक्वेल तारा सिंग आणि त्याच्या कुटुंबाच्या सुरक्षेभोवती फिरेल. त्याचबरोबर या चित्रपटात त्याच्या मुलाची भूमिका करणारा बालकलाकार उत्कर्ष शर्मा देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.