ETV Bharat / entertainment

Karan Deol's mehendi ceremony : सनी देओलच्या घरी लगीनगाई, धर्मेंद्रच्या घरी वाजंत्र्यांची लगबग - लग्न

अभिनेता सनी देओलचा मुलगा करण लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. करण आणि द्रिशा आचार्य यांच्या प्री-वेडिंग फंक्शन्सला सोमवार पासून सुरुवात झाली. सोशल मीडियावर या कार्यक्रमाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

Karan Deol's mehendi ceremony
करण देओलचा मेहंदी सोहळा
author img

By

Published : Jun 16, 2023, 4:48 PM IST

मुंबई : अभिनेता सनी देओलचा मुलगा करण देओल विवाहबंधनात अडकणार आहे. करण आणि द्रिशा आचार्य यांच्या प्री-वेडिंग फंक्शन्सला सोमवार पासून सुरुवात झाली. करण आणि द्रिशाचा मेहंदी सोहळा १५ जूनला पार पडला. सोशल मीडियावर या कार्यक्रमाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. मेंहदीचा कार्यक्रम हा सनीच्या निवासस्थानी झाला असून या कार्यक्रमात करणने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओत सनी हा गेटवर सर्वांचे अभिवादन करताना दिसला. त्याने मुलाच्या लग्नासाठी त्यांच्या हातावर मेंहदी काढल्याचे दिसत आहे. त्याने मेहंदी काढलेला हात देखील यावेळी दाखविला आहे. सनीच्या हातावर अनेक धार्मिक चिन्हे काढलेली दिसत आहे. पीच शर्ट आणि पांढर्‍या पँटमध्ये सनी फार सुंदर दिसत आहे.

सनी देओलच्या मुलाचे लग्न : दरम्यान यावेळी करण देखील पिवळा कुर्त्यामध्ये कारमध्ये हसताना दिसला आणि त्याने देखील पापाराझीला पोझ दिली. करणच्या हातावर द्रिशाचे नाव लिहले दिसत आहे. सोमवारी रात्री रोका समारंभाने लग्नाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. सध्याला या लग्नाचे फोटो ट्रेंडमध्ये आहेत. 2018 मध्ये आलेल्या 'बधाई हो' या चित्रपटातील 'मोरनी बनके' या गाण्यावर नाचताना सनी देओलचा व्हिडिओ हा सोशल मीडियावर सध्याला व्हायरल झाला आहे. सनी, बॉबीचा चुलत भाऊ अभय देओल हा देखील या कार्यक्रमात सहभागी झाला होता. त्याने देखील यावेळी पापाराझीला पोझ देवून फोटो काढले आहे.

फोटे केले शेअर : अभिनेता बॉबी आणि अभय देओलने त्यांच्या पुतण्याच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, करण आणि द्रिशा 18 जूनला लग्नबंधनात अडकणार आहेत. ते दोघे बऱ्याच दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये होते. लग्नाच्या सर्व विधी धर्मेंद्र यांच्या बंगल्यावर पार पडणार आहेत. धर्मेंद्र यांच्या जुहू येथील बंगल्याबाहेर वाजंत्री गर्दी करताना दिसले. यावेळी वादकांनी पिवळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता. याशिवाय या हे लोक मोठ्याने ढोल वाजवताना यावेळी दिसत आहे. या जोडप्याला आपल्या कुटुंबाच्या उपस्थितीत विवाह करायचा आहे. त्यानंतर दोघे मुंबईत एक भव्य रिसेप्शन देणार आहेत.

हेही वाचा :

  1. Ashish Vidyarthi and Rupali Barua : आशिष विद्यार्थी आणि रुपाली बरुआ अज्ञातस्थळी करताहेत एन्जॉय
  2. Adipurush releases on 10K screens : आदिपुरुष १० हजार स्क्रिन्सवर रिलीज, बॉक्स ऑफिसवर त्सुनामी
  3. The Vaccine War : नाना पाटेकरसह बंगाली अभिनेत्री रायमा सेन द व्हॅक्सिन वॉरच्या कास्टमध्ये सामील

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.