ETV Bharat / entertainment

Gadar 2 Low Budget Movie : 'गदर २' चित्रपटासाठी सनी देओलने घेतली कमी फी ; अनिल शर्माने केला खुलासा... - गदर २साठी सनी देओलने घेतली कमी फी

'गदर २' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याआधी या चित्रपटाबाबत एक मोठा खुलासा दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी केला आहे. या चित्रपटाबाबत त्यांनी सांगितले की, या चित्रपटासाठी सनी देओलने कमी फी घेतली.

Gadar 2
गदर २
author img

By

Published : Aug 10, 2023, 12:09 PM IST

मुंबई: 'गदर: एक प्रेम कथा'च्या ब्लॉकबस्टर हिटनंतर, तब्बल दोन दशकांपेक्षा जास्त कालावधीनंतर 'गदर २' धमाल करण्यासाठी सज्ज झाला आहे. 'गदर २' ११ ऑगस्टला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. याआधी चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी सनी देओलच्या मानधनाबाबत खुलासा करताना सनी देओलने या चित्रपटासाठी त्याच्या फीमध्ये तडजोड केल्याची माहिती दिली. खरे पाहता 'गदर २'चे बजेट फारसे नव्हते त्यामुळे सनी देओलने या चित्रपटासाठी स्वतःची फी कमी केली.

अनिल शर्मा केला खुलासा : एका मुलाखतीत अनिल शर्मा यांनी सांगितले की, जेव्हा चित्रपट निर्माते त्यांच्याशी चित्रपटात वापरलेल्या वाहनांबद्दल बोलत होते, तेव्हा त्यांना चित्रपटाच्या बजेटबद्दल विचारण्यात आले होते. त्यावर थोडा वेळ विचार केल्यानंतर आपण, 'बाजारात लोक ८०, १००, १५० कोटी बोलतात. पण आमचे बजेट तसे काही नाही. हा चित्रपट खूप कमी बजटमध्ये तयार होईल.' असे ठामपणे म्हटले.

सनी देओलने स्वतः फी कमी केली : 'गदर २' मध्ये तारा सिंगच्या मुलाची भूमिका करणारा वास्तवातला अनिल शर्मा यांचा मुलगा अभिनेता उत्कर्ष शर्मानेही वडिलांच्या म्हणण्याला दुजोरा दिला आहे. टेक्निशियनपासून कलाकारापर्यंत चित्रपटाचे जास्तीत जास्त बजेट निर्मितीसाठी खर्च व्हावे, असे आपल्याला वाटत असल्याचे त्याने सांगितले. दुसरीकडे, अनिल शर्मा पुढे म्हणतात की, प्रत्येकाच्या फीवर बजेटनुसार नियंत्रण करण्यात आले होते. सनी देओलच्या फीबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, 'सनीने स्वतःची फी कमी केली होती. आजकाल अभिनेत्यांची फी दिग्दर्शकांपेक्षा खूप जास्त आहे.'

भारतीय सैन्य दलाचे विशेष आभार : अनिल शर्मा यांच्या मते शूटिंगचे बजेट ५०० -६०० कोटींपर्यंत असते. त्यातील १५० ते २०० कोटींचा वाटा मुख्य कलाकाराचा असतो. पण आम्ही हा विचार केला की, हा पैसा प्रोडक्शनमध्ये गुंतवावा, असे आम्हाला वाटत होते. अनिल शर्मा यांनी पुढे खुलासा केला की, कमी बजेटमुळे व्हीएफएक्स न वापरता 'गदर २'मध्ये रिअल अ‍ॅक्शन चालवण्यात आले. तसेच भारतीय सैन्य दलानेही चित्रपट निर्मात्यांना सहकार्य केले. याशिवाय त्यांना त्यांची वाहने, रणगाडे आणि सैनिक तसेच शूटिंगसाठी जागा उपलब्ध करून दिली.

हेही वाचा :

  1. GADAR 2 SCREENING : सनी देओलच्या 'गदर २'चे सैनिकांसाठी खास स्क्रिनिंग, जवानांच्या घोषणांनी थिएटर दणाणले
  2. Kushi trailer launch: 'खुशी'साठी सामंथाची कितीही प्रतीक्षा करण्यास तयार होता विजय देवराकोंडा
  3. Parineeti Chopra : परिणीती चोप्राने गायले लता मंगेशकरांचे 'हे' सुंदर गाणे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.