ETV Bharat / entertainment

Sunny Deol Birthday: सनी देओलच्या वाढदिवसानिमित्त 'या' कलाकारांनी दिल्या शुभेच्छा... - 66वा वाढदिवस

Sunny Deol Birthday: अभिनेता सनी देओल आज आपला 66वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास प्रसंगी त्याला अनेकजण शुभेच्छा देत आहेत.

Sunny Deol Birthday
सनी देओलचा वाढदिवस
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 19, 2023, 6:56 PM IST

मुंबई - Sunny Deol Birthday: हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता सनी देओल आपला 66 वा वाढदिवस 19 ऑक्टोबर रोजी साजरा करत आहे. दरम्यान आता सनी देओलची मुले करण देओल आणि राजवीर देओल यांनी या खास प्रसंगी वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. याशिवाय सनीचे वडील धर्मेंद्र, भाऊ बॉबी देओल आणि बहीण ईशा देओल यांनीही त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा इंस्टाग्राम हँडलवर दिल्या आहेत. अलीकडेच 'गदर 2' च्या यशानंतर चाहत्यांच्या मनावर सनी देओलनं एक छाप सोडली आहे. सनीचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला आहे. यानंतर त्याला अनेक चित्रपटांच्या ऑफर मिळत आहेत.

सनी देओलचा वाढदिवस : सनीच्या वाढदिवशी, भाऊ बॉबी देओलनं त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर काही फोटो शेअर केली आहेत. या फोटोंमध्ये सनी आणि बॉबी एकमेकांसोबत डान्स करताना दिसत आहेत. फोटोंच्या कॅप्शनमध्ये बॉबी देओलनं लिहिलं, 'लव्ह यू भाऊ, वाढदिवसाच्या शुभेच्छा.' याशिवाय अजय देवगणनं त्याच्या इन्स्टा स्टोरीमध्ये सनी देओलचा फोटो शेअर करत हॅपी बर्थडे लिहिलं आहे. चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी त्याला या खास प्रसंगी शुभेच्छा दिल्या आहेत. धर्मेंद्र यांनीही इन्स्टाग्राम स्टोरीवर सनी देओलचा व्हिडिओ पोस्ट करून जुन्या आठवणी ताज्या केल्या आहेत. त्याचबरोबर ईशा देओलनं तिच्या मोठ्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत इंस्टाग्राम स्टोरीवर सनी देओलसोबतचा तिचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यात तिनं लाल हार्ट, हात आणि अनेक इमोजी कॅप्शनसह 'हॅपी बर्थडे भैया' असं लिहलं आहे. 'गदर-2'च्या सक्सेस पार्टीदरम्यान हा फोटो क्लिक करण्यात आला होता.

सनी देओलच्या दोन्ही मुलांनी त्याला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा : करण देओलनं त्याच्या अधिकृत इंस्टाग्रामवर वडिलांसोबतचे थ्रोबॅक फोटो शेअर केले आहेत. यासोबत त्यानं कॅप्शनमध्ये लिहलं, 'हॅपी बर्थडे डॅड. तुमची प्रतिभा आणि प्रेम मला दररोज प्रेरणा देते. हे वर्ष आणखी यश आणि आनंदाने भरले जावो'. पोस्टमधील पहिला फोटो हा करणच्या विवाहच्या दरम्यानचा आहे, तर दुसऱ्या फोटोत सनी देओल आपल्या मुलाला मिठी मारताना दिसत आहे. दोघांचा खास बॉन्ड या फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे. दुसरीकडे, राजवीरनं आपल्या वडिलांसोबतचा एक सुंदर फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोला त्यानं कॅप्शन दिले, 'हॅपी बर्थडे डॅड. तुमचा वाढदिवस तुमच्यासारखाच अद्भुत आणि अविश्वसनीय जावो. तुझ्यावर प्रेम आहे.' या पोस्टवर अनेक चाहते सनी देओलला शुभेच्छा देत आहेत.

हेही वाचा :

  1. Arijit Singh sings for Salman : सलमानच्या 'टायगर 3' चं पहिलं गाणं, पहिल्यांदाच अरिजित सिंगच्या आवाजात
  2. Raj Kundra : 'यूटी69'चा ट्रेलर रिलीजनंतर राज कुंद्रा पहिल्यांदाच विमानतळावर मास्कशिवाय दिसला; पहा व्हिडिओ...
  3. Naal 2 Bhingori song out : 'नाळ 2'मधील मनाचा ठाव घेणारं ‘भिंगोरी’ गाणं प्रदर्शित; पहा व्हिडिओ...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.