ETV Bharat / entertainment

साऊथ स्टार विजय सेतुपती आणि सनी देओलचा 'इफ्फी'तील फोटो व्हायरल - गांधी टॉक्स चित्रपट

Sunny Deol and Vijay Sethupathi : साऊथ अभिनेता विजय सेतुपती आणि सनी देओल सध्या चर्चेत आले आहे. त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय. गोव्यातील 54 व्या इफ्फी चित्रपट महोत्सवात हे दोन स्टार एकत्र आले होते.

Sunny Deol and Vijay Sethupathi
विजय सेतुपती आणि सनी देओल
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 22, 2023, 5:03 PM IST

मुंबई - Sunny Deol and Vijay Sethupathi : साऊथ चित्रपट अभिनेता विजय सेतुपती आणि बॉलिवूडचा तारा सिंग उर्फ सनी देओलचा एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. आता हा फोटो कुठल्या प्रसंगातला आहे, हा सर्वांना प्रश्न पडत आहे. काहीजणांना असं वाटत आहे की, दोघेही आगामी चित्रपटासाठी एकत्र आले असावेत. 'जवान' चित्रपटातून विजय सेतुपतीनं रुपेरी पडद्यावर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटामध्ये तो खलनायकाच्या भूमिकेत दिसला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला. सनी देओल आणि विजय सेतुपती खरोखरच चित्रपटात एकत्र येणार आहेत का? या फोटोची वास्तविकता काय आहे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

सनी देओल आणि विजय सेतुपती फोटो व्हायरल : या फोटोमध्ये सनी देओलनं बेज कलरच्या पॅन्टखाली ऑलिव्ह कलरचा टी-शर्ट आणि ब्लेझर घातला आहे. दुसरीकडे विजयनं फोटोत काळ्या रंगाचा शर्ट परिधान केला आहे. याशिवाय त्यानं यावर चष्मा घातला आहे. या फोटोमध्ये दोघेही देखणे दिसत आहेत. आता नुकताच 54वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गोव्याची राजधानी पणजी येथे आयोजित करण्यात आला आहे, यासाठी विजय सेतुपती त्याच्या 'गांधी टॉक्स' चित्रपटासाठी आला होता. हा चित्रपट या महोत्सवात रिलीज करण्यात आला. 'गांधी टॉक्स' हा भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिला मूक चित्रपट आहे, जो गोव्यातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित करण्यात आला.

'गांधी टॉक्स' चित्रपटाची स्टार कास्ट : भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सनी देओल देखील आला होता. त्यानंतर विजयनं या कार्यक्रमादरम्यान त्याच्यासोबत फोटो काढला. 'गांधी टॉक्स' या चित्रपटात साऊथ स्टार विजय सेतुपती व्यतिरिक्त अरविंद स्वामी, अदिती राव हैदरी, सिद्धार्थ जाधव यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटाला संगीत ए आर रहमान यांनी दिलं आहे. 'गांधी टॉक्स' चित्रपटाचं दिग्दर्शन किशोर बेलेकर यांनी केलं आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शकानं सांगितलं की, 'गांधी टॉक्स' हा त्यांचा पॅशन प्रोजेक्ट आहे, ज्यावर ते 20 वर्षांपासून विचार करत होते.

हेही वाचा :

  1. गणेश आचार्यच्या सिग्नेचर स्टेप्सवर थिरकला किंग खान, 'डंकी'चं 'लुट पुट गया' गाणं लॉन्च
  2. बॉक्स ऑफिसवर 'टायगर 3'च्या कमाईत झाली घसरण ; पाहा किती गल्ला जमवला
  3. सैनिकांना प्रेरणा देणाऱ्या 'सॅम बहादूर' चित्रपटातील 'बंदा' गाणं लॉन्च

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.