मुंबई - Dunki first show on the first day : शाहरुख खानच्या 'डंकी' चित्रपटाची प्रतीक्षा संपली असून गुरुवारी पहाटेपासूनच चाहत्यांनी थिएटरच्या बाहेर रांगा लावल्याचं चित्र पाहायला मिळालं. शाहरुख आणि राजकुमार हिराणी हे नवं समीकरण पहिल्यांदाच पाहायला मिळणार असल्यामुळे दोघांच्याही चाहत्यांमध्ये अमाप उत्साह पाहायला मिळतोय. आज पहिल्या दिवशी पहिला शो पाहणाऱ्यामध्ये कॉमेडियन सुनिल पाल देखील होता. त्यानं 'डंकी'ची तीन तिकीटे बुक केली होती आणि शाहरुखचा हा चित्रपट हॅट्रीक करणार असल्याची भावना त्यानं व्यक्त केली.
-
#WATCH | Maharashtra: Sunil Pal, Comedian speaks on Shah Rukh Khan's film 'Dunki', says, "It will be hat trick (Pathaan, Jawan and Dunki)..." https://t.co/Q0a0aflbcX pic.twitter.com/4UoCcCChSE
— ANI (@ANI) December 21, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH | Maharashtra: Sunil Pal, Comedian speaks on Shah Rukh Khan's film 'Dunki', says, "It will be hat trick (Pathaan, Jawan and Dunki)..." https://t.co/Q0a0aflbcX pic.twitter.com/4UoCcCChSE
— ANI (@ANI) December 21, 2023#WATCH | Maharashtra: Sunil Pal, Comedian speaks on Shah Rukh Khan's film 'Dunki', says, "It will be hat trick (Pathaan, Jawan and Dunki)..." https://t.co/Q0a0aflbcX pic.twitter.com/4UoCcCChSE
— ANI (@ANI) December 21, 2023
त्याच्या 'डंकी' पाहण्याच्या उत्साहाबद्दल थिएटरच्या रांगेत उभं राहून बोलताना तो म्हणाला, "तुम्ही पाहताय सगळीकडे शाहरुखच्या घोषणा ऐकू येत आहेत. मी टोपीही घातलीय त्यावर एक स्टार दिसतोय तो एकमेव तारा शाहरुख खान आहे. मी पहिल्यापासूनच त्याचा चाहता राहिलो आहे. मी त्याचा प्रत्येक चित्रपट पाहिला आहे. आज मॉर्निंग शो आहे. मी ठरवलं पहिल्या दिवशी पहिला शो पाहायचा, त्यासाठी मी तीन तिकीटे काढली आहेत. तीन तिकीटांचा अर्थ आहे हॅट्रीक. शाहरुख खानच्या 'पठाण' आणि 'जवान' नंतर आता हॅट्रीक होईल. दोन हजार कोटीचा गल्ला तर जमणारच भाई, एक हजार शाहरुखचे आणि एक हजार राजकुमार हिराणीसाठी. दोन्ही जादुगार आहेत, दोन्ही बाजीगर आहेत."
हे वर्ष शाहरुख खानसाठी खूप चांगले राहिल आहे. पहिल्यांदा 'पठाण', नंतर 'जवान' आणि आता 'डंकी' आलाय. अशा प्रकारे या वर्षाची अखेर ही शाहरुखच्या चित्रपटाने होत आहे. या ट्रेंडबद्दल बोलाना सुनिल पाल म्हणाला, ''दोन अॅक्शन चित्रपटानंतर आता शाहरुखचा रोमँटिक चित्रपट येत आहे. हा चित्रपट 21 ला रिलीज होतोय. 21 म्हणजे 2 आधी हिट झालेत आणि 1 आता हिट होणार आहे. त्यामुळे हॅट्रीक होणार आहे. मी 'सालार' चित्रपटालाही शुभेच्छा देईन, कारण अल्लु अर्जुनने म्हटले होते, 'झुकेगा नही साला' आणि आता प्रभास म्हणतोय, 'झुकेगा नही सालार.''
सुनिल पालने आपल्या खास मिमिक्री स्टाईलमध्ये शाहरुख खानला 'डंकी'साठी शुभेच्छा देताना म्हटले, "बहोत दिनो की बाद फिल्म बनी है ढंग की, उसका नाम है डंकी, तो आपको रिक्वेस्ट कर रहा है यह मंकी, तो फिल्म देखो और जो नही देखनेवाला आदमी होगा.... " म्हणत त्याने 'डाँकी'ची मिमिक्री केली.
हेही वाचा -