ETV Bharat / entertainment

Sulochana Latkar : लता मंगेशकर ते बिग बीने समर्थन देऊनही सुलोचना दीदींची 'ती' इच्छा राहिली अपूर्ण

मराठमोळ्या सिनेकर्मीच्या नावे असलेला दादासाहेब फाळके पुरस्कार मराठी कलाकाराला मात्र का दिला जात नाही अशी ओरड गेली अनेक वर्षे सुरू आहे. प्रख्यात मराठी अभिनेत्री सुलोचना लाटकर यांना हा पुरस्कार केंद्राने हा पुरस्कार तातडीने द्यायला हवा असे मत अनेक प्रतिष्ठित मंडळींनी वारंवार व्यक्त केले होते. मात्र तब्बल ५० वर्षे चित्रपटसृष्टीची सेवा करणाऱ्या सुलोचना दीदींना दादासाहेब फाळके पुरस्कारापासून अखेरपर्यंत वंचितच ठेवण्यात आले.

Sulochana Latkar
दादासाहेब फाळके पुरस्कारापासून वंचित राहिल्या सुलोचना दीदी
author img

By

Published : Jun 5, 2023, 10:45 AM IST

मुंबई - भारतीय सिनेसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या नावे केंद्र सरकार अत्यंत मानाचा पुरस्कार सिनेसृष्टीची सेवा केल्याबद्दल दिला जातो. तब्बल ५० वर्षे चित्रपटसृष्टीची सेवा करणाऱ्या सुलोचना दीदींना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळायला हवा, असे मत दिग्गज रामदास फुटाणे, उज्वल ठेंगडी यांच्यासह अनेक मान्यवरांनी वारंवार व्यक्त केले होते. सुलोचना दीदींचे वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झाल्यानंतर पुन्हा एकदा या विषयाची चर्चा सुरू झाली आहे.

सुलोचना दीदींना निदान मरणोत्तर दादासाहेब फाळके पुरस्कार द्यावा अशी मागणी ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून केली आहे. सुलोचना यांच्या दीर्घ सेवेबद्दल पोस्ट लिहिल्यानंतर अखेरीस देसाई यांनी म्हटलंय की, 'त्यांच्या डोळ्यांतील चमक विलक्षण होती. हसणेही निर्मळ. एक माणूस म्हणून त्या खूप अस्सल आणि मोठ्या होत्या. दीदींना चित्रपटसृष्टीचा सर्वोच्च असा दादासाहेब फाळके पुरस्कार, त्या हयात असताना देण्यात आला नाही. निदान मरणोत्तर तरी त्यांना हा सन्मान जरूर द्यावा आणि त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरूर प्रयत्न करावा', असे माझे आवाहन आहे.

सुलोचना यांना फाळके पुरस्कार मिळावा अशी दिग्गजांनी केली होती मागणी - सुलोचना दीदींच्या ९०व्या वाढदिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुभेच्छा दिल्या होत्या तेव्हा फाळके पुरस्कार सुलोचना दीदींना मिळेल अशी अटकळ बांधली जात होती. तसेच अशा प्रकारची इच्छा लता दीदी (मंगेशकर), आशुतोष गोवारीकर, सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन आदींनी व्यक्त केली होती. त्यामुळे केंद्र सरकारने दादासाहेब फाळके पुरस्कार सुलोचना दीदींना द्यावा अशी मागणी जोर धरली होती. मात्र पुढे काहीच घडले नाही.

ज्येष्ठ समीक्षक आणि चित्रपट अभ्यासक दिलीप ठाकूर यांनीही अशी मागणी करताना म्हटले होते, ’सुलोचनादीदींची मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील दीर्घकालीन वाटचाल, अनुभव, अभिनय निष्ठा पाहता त्यांना यापूर्वीच दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात यायला हवे होते. नायिका ते चरित्र भूमिका असा यशस्वी चौफेर प्रवास करताना त्या एकूणच बदलत्या चित्रपटसृष्टीच्या साथीदार आणि साक्षीदारदेखील आहेत.’

ज्येष्ठ लेखक दिग्दर्शक उज्वल ठेंगडी यांनीही सुलोचना लाटकर यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे अशी जोरदार मागणी केली होती. याबद्दल बोलताना ठेंगडी म्हणाले होते, 'दिग्गज अभिनेत्री म्हणून त्यांनी काळ गाजवला आहे. एखादी भूमिका दाखवा ज्यामध्ये त्यांनी आपले अभिनय कलेचे प्राण ओतले नाहीत. अनेक चित्रपटातून अभिनेत्याच्या आईची भूमिका वटवत वेगळी ओळख चित्रपट सृष्टीत निर्माण केली आहे. तसेच देशातील राष्ट्रापतीच्या हस्ते सर्वाधिक गौरव झालेल्या त्या एकमेव अभिनेत्री आहेत. असे असताना दादासाहेब फाळके पुरस्कारापासून त्या वंचित असल्याचे पाहून वाईट वाटते'.

अभिनेत्री सुलोचना लाटकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी मनसे नेते अमेय खोपकर यांनी तत्कालिन केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे केली होती. मात्र केंद्र सरकारकडून याबाबत कोणतेही ठोस पाऊल उचलले गेले नाही.

बिग बींनी दिला होता आईचा दर्जा - सुलोचना दीदींनी मराठी चित्रपटांबरोबरच अनेक हिंदी चित्रपट केले ज्यात वहिनी, बहीण, आई इत्यादी व्यक्तिरेखा साकारल्या. त्यांचे अनेक सुपरस्टार्स सोबतचे संबंध वात्सल्याचे, जिव्हाळ्याचे होते. सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी त्यांना त्यांच्या आयुष्यात आईचा दर्जा दिला होता किंवा आहे व काही वर्षांपूर्वी बिग बी सुलोचना दीदींच्या प्रभादेवी येथील घरी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायलाही पोहोचले होते. अमिताभ यांनी सुलोचना दीदींच्या वाढदिवसाला भेट दिली होती. हा फोटो बिग बी यांनी ट्विटरवर शेअर केला होता.

Sulochana Latkar
सुलोचना दीदींची बिंग बींनी घेतली होती भेट

दादासाहेब फाळके पुरस्कार आहे तरी काय ? - भारतीय चित्रपटाचे जनक धुंडिराज गोविद फाळके उर्फ दादासाहेब फाळके यांच्या नावाने 1969 पासून म्हणजेच जन्मशताब्दी वर्षपासून सुरू करण्यात आला. चित्रपट सृष्टीत उत्तम कामगिरी करणाऱ्यांना हा मानाचा पुरस्कार दिला जातो. भारत सरकारच्या माहिती आणि नभोवाणी खात्यातर्फे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात दिला जातो. अलीकडच्या काळात शशी कपूर, मनोज कुमार, विनोद खन्ना, अमिताभ बच्चन यांना दिला आहे. तेच महिलांमध्ये लता मंगेशकर आणि आशा भोसले यांना देण्यात आला आहे.

सुलोचना लाटकर यांचे चित्रपट जग - सुलोचना लाटकर यांनी 1943 पासून भालजी पेंढारकर यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर एका मागून एक असे अनेक चित्रपटातून ओळख निर्माण केली. त्यांच्या कारकिर्दीत आईच्या भूमिकेसाठी विशेष ओळख मिळाली. त्यांना चित्रभूषण आणि महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. अब दिल्ली दूर नही, कटी पतंग, संपूर्ण रामायण, मराठा तितुका मेळवावा अशा अनके चित्रपटात त्यांनी अभिनय करत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. सुलोचनादीदींनी जुन्या पिढीतील दिग्गज अभिनेत्यांसह अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, राजेंद्रकुमार, शशी कपूर आदींसोबत पडद्यावर तोडीस तोड अभिनय केला आहे. खानदानी अभिनय आणि विनम्र स्वभाव यामुळे भारतीय सिनेसृष्टीत दीदींनी मानाचं स्थान मिळवलं आहे. कृष्णधवल सिनेमा पासून सुरू होऊन रंगीत सिनेमापर्यंत पोहोचलेल्या चित्रपट प्रवासाच्या त्या साक्षीदार राहिल्या आहेत. सुलोचना दीदींचं मूळ नाव सुलोचना लाटकर आहे. कोल्हापूरमधल्या खडवलट गावी सुलोचना दीदींचा जन्म झाला. २५० हून अधिक मराठी आणि १५० हून अधिक हिंदी सिनेमांमध्ये दीदींनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

हेही वाचा -

१. Actress Sulochna Latkar Funeral: ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांच्या पार्थिवावर आज होणार अंत्यसंस्कार

२. Actress Sulochna Latkar Passes Away : ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचे निधन; आज शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.