मुंबई - बॉलिवूडचा पठाण शाहरुख खानची लेक सुहाना खान सध्या गोव्यामध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे. तिने सोशल मीडियावर काही नवीन फोटो शेअर केले आहेत. तिच्या इन्स्टा फॉलोअर्सना तिने आपल्या बीच हॉलिडेची झलक दाखवली आहे.
सुहान खान शाहरुखच्या चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय असली तरी तिचे स्वतःचेही मोठ्या संख्ये फॉलोअर्स आहेत. अद्याप तिने रुपेरी पडद्यावर पदार्पण केलेले नाही. सुहाना खान तिच्या ''द आर्चीज' या पदार्पणाच्या चित्रपटाच्या रिलीजची वाट पाहत आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी रिव्हरडेलच्या किशोरवयीन मुलांवर आधारित १९६० च्या दशकातील लाइव्ह-अॅक्शन म्युझिकल गोष्ट असलेल्या द आर्चिजचा ट्रेलर अद्याप रिलीज केलेला नाही. प्रसिद्ध दिग्दर्शिका झोया अख्तर दिग्दर्शित द आर्चीज चित्रपटात अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा आणि दिवंगत सुपरस्टार श्रीदेवी आणि चित्रपट निर्माते बोनी कपूर यांची धाकटी मुलगी खुशी कपूर यांच्याही भूमिका असणार आहेत.
सुहाना खानचे इन्स्टाग्रामवर ३. ९ दशलक्ष फॉलोअर्ससह आहेत. ती त्यांच्या संपर्कात राहण्याचा नेहमी प्रयत्न करत असते. आपल्या नियमित गोष्टींचे अपडेट ती चाहत्यांना कळवते. आताही तिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर समुद्राच्या लाटांचा एक व्हिडिओ टाकला आणि तो गोव्याला जिओटॅग केला आहे.
इंस्टाग्रामवर सुहानाने तिच्या गोव्याच्या डायरीमधील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती ब्रीझी मॅक्सी ड्रेस घातलेली दिसत आहे. अथांग पाणी आणि ग्रेडियंट आकाशाच्या पार्श्वभूमीवर सुगाना खानने तिच्या लेटेस्ट फोटोत सुपर फ्रेश दिसत आहे. चाहत्यांनी तिच्या या लूकसाठी लाईक्स आणि ह्रदयाच्या इमोजींचा वर्षाव सुरू ठेवला आहे.
दरम्यान, सुहाना खान ही बच्चन यांचा नातू अगस्त्यसोबतच्या तिच्या कथित रोमान्समुळे देखील चर्चेत आहे. दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या अनेकदा चर्चा रंगलेल्या असतात. पण ते त्यांच्या कथित रिलेशनला लपवत आहेत. सुहाना आणि अगस्त्या अनेकदा मित्रांसोबत गेट टुगेदर करताना दिसले होते. सुहानाने गेल्या वर्षी अगस्त्याची आई श्वेता बच्चन नंदा आणि बहीण नव्या नवेली नंदा यांच्यासोबत कपूर कुटुंबाच्या ख्रिसमस पार्टीला हजेरी लावली होती, त्यानंतर त्याच्या डेटिंग लाईफची जोरदार चर्चा रंगली होती.
हेही वाचा -
२. Guns and Gulab : 'गन्स अँड गुलाब' मालिकेचे अभिनेता दुल्कर सलमानचे मोशन पोस्टर लॉन्च