ETV Bharat / entertainment

Ananya Panday birthday : सुहाना खान आणि शनायानं 'बेस्टी' अनन्याला दिल्या वाढदिवसाच्या गोड शुभेच्छा - Shanaya Kapoor wishes Ananya Panday

अभिनेत्री अनन्या पांडे आज आपला 25 वा वाढदिवस साजरा करतेय. यानिमित्तानं तिच्यावर वाढदिवस शुभेच्छांचा वर्षाव मित्र मैत्रीणी, कुटुंबीय आणि चाहत्यांकडून सुरूय. अशातच तिची बेस्ट फ्रेंड सुहाना खान आणि शनाया कपूरनं गोड शुभेच्छा दिल्यात.

Ananya Panday birthday
अभिनेत्री अनन्या पांडे वाढदिवस
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 30, 2023, 10:18 AM IST

मुंबई - वाढदिवसाला आपल्या प्रियजनांकडून लाड आणि कौतुक मिळाल्यानं माणसाच्या अंगावरचं मूठभर मांस वाढतं असं म्हणतात. या दिवशी लोक आपली आठवण काढतात, शुभेच्छा देतात, प्रेम करतात ही भावनाच मंतरुन टाकणारी असते. हाच अनुभव आज अभिनेत्री अनन्या पांडे घेतेय. ती आपला 25 वा वाढदिवस आनंदानं साजरा करण्यासाठी सज्ज झालीय. अनन्याचे चाहते, मित्रमंडळी आणि कुटुंबातील सदस्यही तिच्या वाढदिवसाला खूप प्रेमाने खास बनवणार आहेत.

Ananya Panday birthday
सुहाना काननं दिल्या अनन्याला शुभेच्छा

तिच्या जवळच्या मैत्रिणी सुहाना खान आणि शनाया कपूर यांनी त्यांच्या सोशल मीडियावरुन अनन्याला शुभेच्छा देताना तिच्यासोबतचे फोटो शेअर केलेत. सुहानानं अनन्यासोबतचा स्वतःचा एक जबरदस्त फोटो अपलोड केलाय आणि सदिच्छा देताना, 'माझ्या बेस्टीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.', असं लिहिलंय.

Ananya Panday birthday
सुहानानं अनन्या आणि तिची लहान बहीण रिसा पांडेसोबतचा फोटो शेअर केला

दुसऱ्या एका इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये तिनं 'लव्ह यू अ‍ॅण्ड एव्हर', असं लिहित सुहानानं अनन्या आणि तिची लहान बहीण रिसा पांडेसोबतचा फोटो शेअर केलाय. फोटोत तिघीही सुशी खाताना दिसताहेत. तिसर्‍या फोटोत सुहाना, अनन्या आणि शनाया काळ्या रंगाच्या मॅचिंग ड्रेसमध्ये क्षण एन्जॉय करताना दिसताहेत.

Ananya Panday birthday
सुहाना खान आणि शनायानं 'बेस्टी' अनन्याला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

शनायाने 'ड्रीम गर्ल2' अनन्या पांडेसोबत एक सेल्फी पोस्ट करून तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. शनाया आणि अनन्याची मैत्रीही खूप खास आहे. त्या एकमेकांच्या सर्व आनंदी क्षणाला संपर्कात राहून एन्जॉय करताना दिसतात. पुढील पोस्टमध्ये शनायानं तिच्या सोशल मीडियावर स्वतःचा आणि अनन्याचा बालपणीचा एक सुंदर व्हिडिओ शेअर केला आहे. 'लव्ह यू', असं कॅप्शन या व्हिडिओला तिनं दिलंय.

अनन्या ही अभिनेता चंकी पांडे आणि भावना पांडे यांची थोरली मुलगी आहे. तिची स्टार किड्ससोबत चांगली मैत्री आहे. सुहाना ही शाहरुख खान आणि गौरी खानची मुलगी आहे आणि शनाया ही संजय कपूर आणि त्याची पत्नी महीप कपूर यांची लाडकी लेक आहे. तिघींची मैत्री सर्वश्रृत आहे. तिन्ही स्टार किड्सची फॅन फॉलोइंग प्रचंड आहे. सुहाना आणि शनाया यांचे डेब्यू अ‍ॅक्टिंग प्रोजेक्ट्स अद्याप रिलीज व्हायचे आहेत, तर अनन्यानं आधीच तिच्या अभिनयाची चमक दाखवून फिल्म इंडस्ट्रीत स्वत:चे स्थान निर्माण केलंय.

अनन्या पांडेनं 2019 मध्ये 'स्टुडंट ऑफ द इयर 2' या करण जोहरच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलें होतं. या चित्रपटात टायगर श्रॉफ आणि तारा सुतारिया देखील होते. चार वर्षांच्या कारकिर्दीत अनन्याने 'पति पत्नी और वो', 'खाली पीली', 'गेहराईं', 'लायगर' आणि 'ड्रीम गर्ल 2' यासह अनेक चित्रपटांमध्ये काम केलंय.

कामच्या आघाडीचा विचार करता अनन्या पांडे येत्या काही महिन्यांत, चाहत्यांना 'खो गये हम कहाँ' मध्ये सिद्धांत चतुर्वेदी आणि आदर्श गौरवसोबत स्क्रीन शेअर करताना दिसेल. तिच्या हातामध्ये प्राइम व्हिडिओचा 'कॉल मी बे' हा वेब शो देखील आहे.

हेही वाचा -

  1. Indian 2 major update : कमल हासन स्टारर 'इंडियन 2'ची इंट्रो'सह पहिली झलक लवकरच मिळणार पाहायला

2. Chiyaan 62 : तमिळ स्टार चियान विक्रमनं केली 'चियान 62' चित्रपटाची घोषणा ; व्हिडिओ केला पोस्ट

3. Urfi Javed : उर्फी जावेदनं 'भूल भुलैया' चित्रपटातील राजपाल यादवच्या छोटा पंडितच्या पात्राची केली कॉपी...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.