ETV Bharat / entertainment

Karan Deol wedding reception: करण देओल आणि द्रिशा आचार्यच्या रिसेप्शनमध्ये अवतरले बॉलिवूडचे दिग्गज तारे तारका - करण देओल आणि द्रिशा आचार्य रिसेप्शन

रविवारी करण देओल आणि द्रिशा आचार्य यांच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, सलमान खान, आमिर खान आणि अनुपम खेर यांच्यासह इतर कलाकार दिसले.

Karan Deol wedding reception
करण देओल आणि द्रिशा आचार्य
author img

By

Published : Jun 19, 2023, 1:45 PM IST

मुंबई - अभिनेता सनी देओलचा मुलगा करणचा विवाह द्रिशा आचार्यशी मुंबईत पार पडला. लग्नानंतर रविवारी भव्य रिसेप्शनचे आयोजन केले होते. या सोहळ्याला फिल्म ाणि पोलिटिक्समधील अनेक सेलेब्रिटी हजर होते. बॉलिवूडचे दीपवीर म्हणून प्रसिद्ध असलेले जोडपे रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांनी भव्य लग्नाच्या रिसेप्शनला हजेरी लावली. सोशल मीडियावर या जोडप्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. या व्हिडिओध्ये दोघेही रिसेप्शन पार्टीत हात हातात घेऊन चालताना, बसून परफॉर्मन्स पाहताना दिसत आहेत. त्यांच्याशिवाय सलमान खान, आमिर खान, अनुपम खेर आदी कलाकारांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

व्हायरल झालेल्या एका फोटोमध्ये रणवीर आणि दीपिका, दिग्गज अभिनेता धर्मेंद्र आणि कॉमेडियन कपिल शर्मा आणि त्याची पत्नी गिन्नी यांच्यासोबत पोज देताना दिसत आहेत. रिसेप्शन पार्टीसाठी, जोडप्याने पारंपारिक पोशाख निवडले. यावेळी रणवीर सिंगने पांढरी शेरवानी आणि पॅंट सोबत मॅचिंग स्टोलसह सनग्लासेस घातले होते, तर दीपिका काळ्या अनारकलीत दिसली होती. आमिर खानने जीन्स आणि तपकिरी रंगाचा शॉर्ट कुर्ता घातला होता. सलमान खान या सोहळ्यात सुरक्षा रक्षकांसोबत पोहोचला होता.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दीपिका आणि रणवीर एकत्र बसून पार्टीत परफॉर्मन्स पाहताना दिसत आहेत. करण देओलने रविवारी सकाळी मुंबईत त्याची दीर्घकाळची मैत्रीण द्रिशा आचार्यसोबत लग्नगाठ बांधली. नवविवाहित जोडप्याचे पहिले अधिकृत लग्नाचे फोटो शेअर करताना अभिनेता सनी देओलने नवविहाहितांना शुभेच्छा दिल्या.

करण आणि द्रिशा अनेक दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. दृष्टी एक फॅशन डिझायनर आहे. मिळालेल्या माहितीनुसार द्रिशा ही बिमल रॉय यांची मुलगी रिंकी भट्टाचार्य यांची नात आहे. करणने वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनय हा व्यवसाय स्वीकारला. त्याने 2019 मध्ये सनी देओल दिग्दर्शित पल पल दिल के पासमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. सनीचा धाकटा मुलगा, राजवीर देओल देखील चित्रपट निर्माते अवनीश बडजात्या यांच्या दिग्दर्शक म्हणून पहिल्या चित्रपटातून अभिनयात पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे.

हेही वाचा -

१. Demand To Ban Adipurush: संपूर्ण देशात 'आदिपुरुष' या चित्रपटावर बंदीची मागणी, भाजप नेत्यांनीही केला निषेध

२. Controversy on adipurush : 'आदिपुरुष'वर लेखक मनोज मुंतशीर यांच्या आई-वडिलांची प्रतिक्रिया; म्हणाले, 'हा चित्रपट...'

३. Tu Maja Sobti : 'मुलगी झाली हो' मधील दिव्या पुगांवकर म्हणतेय 'विठ्ठल माझा सोबती'!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.