ETV Bharat / entertainment

SRK Shares Chaleya Song Teaser : 'जवान' चित्रपटामधील 'चलेया' गाण्याचा टीझर शाहरुख खानने केला शेअर.... - नयनतारा

शाहरुख खान स्टारर 'जवान' या चित्रपटाचे प्रमोशन जोरात सुरू झाले आहे. थिएटरमध्ये चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी काही दिवसच शिल्लक आहेत. दरम्यान, शाहरुख खानने त्याच्या आगामी 'जवान' चित्रपटामधील 'चलेया' गाण्याचा टीझर शेअर केला आहे.

SRK Shares Chaleya Song Teaser
चलेया गाण्याचा टिझर प्रदर्शित
author img

By

Published : Aug 13, 2023, 6:58 PM IST

मुंबई : शाहरुख खान हा आगामी 'जवान' चित्रपटामुळे चर्चेत आहे. 'पठाण' चित्रपटाने २०२३ वर्षाची धमाकेदार सुरुवात केल्यानंतर किंग खान आता 'जवान'सोबत आग पसरवण्यासाठी सज्ज झाला आहे. 'जवान' चित्रपट प्रदर्शित होण्यास आता काही दिवसच उरले आहे. मात्र आता सोशल मीडियावर 'जवान'ची क्रेझ थांबण्याचे नाव घेत नाही आहे. दुसरीकडे, चाहत्यांची उत्कंठा दुप्पट करण्यासाठी निर्मात्यांनी शाहरुख आणि नयनताराचे रोमँटिक गाणे 'चलेया'चे टीझर प्रदर्शित केले आहे. चित्रपट रिलीज होण्याआधी निर्माते चित्रपटाबाबत एकामागून अपडेट्स शेअर करत आहेत.

'चलेया' गाण्याचे टिझर प्रदर्शित : शाहरुख खान आणि नयनतारा पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर रोमान्स करताना दिसणार आहेत. 'जवान' चित्रपटात शाहरुख आणि नयनतारा एका वेगळ्याच अंदाजात प्रेक्षकांना रूपेरी पडद्यावर दिसणार आहे. 'पठाण'च्या यशानंतर शाहरुख खान 'जवान'मधून पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. 'जिंदा बंदा' हे पहिले गाणे रिलीज झाल्यानंतर निर्मात्यांनी दुसरे गाणे 'चलेया' रिलीज करण्याची घोषणा केली. हे गाणे १४ ऑगस्टला रिलीज होणार आहे. याआधी, चाहत्यांना या गाण्याची झलक दाखविण्यात आली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. ज्यामध्ये शाहरुख खान आणि नयनतारा दिसत आहे.

वेगवेगळ्या भाषेत होणार रिलीज : शाहरुख खानने रविवारी त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवर 'जवान' चित्रपटातील त्याच्या 'चलेया' या गाण्याचा टीझर रिलीज केला आहे. या गाण्याचा टीझर हिंदी, तामिळ आणि तेलगू भाषांमध्ये रिलीज करण्यात आला आहे. या गाण्याचा व्हिडिओ शेअर करत किंग खानने कॅप्शनमध्ये लिहिले, प्रेम तुमच्या हृदयापर्यंत पोहोचेल' 'चलेया तेरी और'. 'चले', 'ह्योडा' हे गाणे उद्या प्रदर्शित होणार आहेत. 'जवान' चित्रपट ७ सप्टेंबर २०२३ रोजी हिंदी, तमिळ आणि तेलगूमध्ये जगभरात प्रदर्शित होणार आहे.

शाहरुख खान आणि नयनताराची केमिस्ट्री : व्हिडिओमध्ये शाहरुख खान आणि नयनताराची गोड केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. दोघेही जहाजावर रोमँटिक डान्स करताना दिसत आहेत. या गाण्यात दोघे खूप सुंदर दिसत आहेत. 'जवान' या चित्रपटाचा आधी प्रीव्ह्यू प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचा ट्रेलर देखील लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्याआधी चित्रपटाचे पोस्टर आणि गाणी एकामागून एक रिलीज होत आहेत. 'जवान'चे दिग्दर्शन अ‍ॅटली कुमार यांनी केले आहे. हा चित्रपट गौरी खान निर्मित आहे. या चित्रपटाद्वारे अ‍ॅटली कुमारही दिग्दर्शक म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.

हेही वाचा :

  1. Sridevi 60th Birthday : श्रीदेवीच्या ६०व्या वाढदिवसाची गुगलकडून खास आठवण, डुडलमध्ये दाखविला चित्रपटसृष्टीतील प्रवास
  2. Gadar 2 box office Collection Day 2 : 'गदर २'चा बॉक्स ऑफिसवर दबदबा; सनी देओलच्या सिनेमाची आजवरची सर्वात मोठी कमाई
  3. Sridevi's 60th Birthday : श्रीदेवीच्या वाढदिवसानिमित्त पती बोनी कपूर आणि मुलगी खुशी कपूर, जान्हवी कपूरने थ्रोबॅक फोटो केला शेअर...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.