ETV Bharat / entertainment

Vijay Thalapathy Film Leo : साऊथ सुपरस्टार विजय थलपथीचा 'लिओ' चित्रपट यूकेमध्ये अनकट होईल रिलीज... - युनायटेड किंगडममध्ये अ‍ॅडव्हान्स बुकिंग

Vijay thalapathy film leo : विजय थलपथीचा 'लिओ' चित्रपट अनेक दिवसांपासून चर्चेत होता. आता या चित्रपटाबाबत एक अपडेट समोर येत आहे. 'लिओ' हा चित्रपट यूकेमध्ये कोणताही कट न करता प्रदर्शित केला जाणार आहे. या चित्रपटाची सध्या यूकेमध्ये खूप क्रेझ पाहायला मिळत आहे.

Vijay thalapathy film leo
विजय थलपथी चित्रपट लिओ
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 13, 2023, 5:41 PM IST

मुंबई - Vijay Thalapathy Film Leo : विजय थलपथीचा आगामी 'लिओ' हा चित्रपट भव्य प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. 'लिओ' हा चित्रपट 19 ऑक्टोबर रोजी जगभरात झळकणार आहे. हा चित्रपट यूकेमध्ये कोणतेही कट न करता प्रदर्शित केला जाणार आहे. लोकेश कनागराज लिखित आणि दिग्दर्शित, 'लिओ' हा एक अ‍ॅक्शन थ्रिलर आहे चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये थलपथी विजय जबरदस्त भूमिकेत दिसेल. तसंच या चित्रपटामध्ये संजय दत्त, त्रिशा, अर्जुन सर्जा, गौतम मेनन, मायस्किन आणि प्रिया आनंद हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. लोकेश कनागराजसोबत रत्ना कुमार आणि धीरज वैद्य यांनी चित्रपटाची पटकथा लिहिली आहे.

युनायटेड किंगडममध्ये अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरू : सध्या 'लिओ'ची रिलीज तारीख जवळ येत असताना, युनायटेड किंगडममध्ये 7 सप्टेंबरपासून अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरू झाली आहे. अवघ्या 5 दिवसांत या चित्रपटानं 1 कोटींहून अधिक कमाई केली आहे. हे कलेक्शन रिलीजच्या पहिल्या दिवसापासूनचं आहे. यापूर्वी परदेशात विजयच्या कोणत्याही चित्रपटाचं आगाऊ बुकिंग नव्हतं. यावेळी पहिल्यांदा असं होत आहे. या मल्टीस्टारर चित्रपटात बॉलिवूडचा खलनायक संजय दत्त देखील धमाल करताना दिसणार आहे. यापूर्वी संजय दत्तच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याचा या चित्रपटामधील फर्स्ट लूक प्रदर्शित केला होता. संजयचा हा लूक चाहत्यांना खूप आवडला होता.

विजयचा अ‍ॅक्शन मोड पाहायला मिळणार : यूकेमध्ये या चित्रपटाबाबत कमालीची क्रेझ आहे. या चित्रपटामध्ये विजयचा लूक खूप जबरदस्त दाखविण्यात आलं होता. विजय या लूकमध्ये अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसला होता. सेव्हन स्क्रीन स्टुडिओ निर्मित, 'लिओ'ला अनिरुद्ध रविचंदरनं संगीत दिलं आहे. 'लिओ' हा चित्रपट अ‍ॅक्शन चित्रपट असणार आहे. 'लिओ' हा तमिळ व्यतिरिक्त, तेलुगु, कन्नड आणि हिंदी भाषांसह डब केलेल्या आवृत्त्यांमध्ये रिलीज होऊ शकतो. या चित्रपटाकडून विजयला खूप अपेक्षा आहे. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर खूप कमाई करेल अशी अपेक्षा केली जात आहे.

हेही वाचा :

  1. Katrina Kaif Desi look: पिवळ्या सलवार सूटमध्ये कतरिना कैफनं जिंकली चाहत्यांची मनं; व्हिडिओ व्हायरल
  2. Jawan Box Office Collection Day 7 : 'जवान' बॉक्स ऑफिसवर गाठणार का 400 कोटींचा टप्पा? कमाईत सहाव्या दिवशी झाली घसरण
  3. Mahima Chaudhary Birthday : महिमा चौधरीनं 'या' चित्रपटापासून केलं होतं बॉलिवूडमध्ये पदार्पण...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.