हैदराबाद : सध्या अभिनेत्री सोनम कपूर गरोदर ( Actress Sonam Kapoor pregnant ) असून लवकरच ती पहिल्या मुलाला जन्म देऊन आईचा आनंद घेणार आहे. सध्या, अभिनेत्री तिच्या प्रेग्नेंसी पीरियडचा मोकळेपणाने आनंद घेत आहे आणि तिने पती आनंद आणि आहुजासोबतच्या तिच्या बेबी बंपचे अनेक फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसाठी शेअर केले आहेत. आता या अभिनेत्रीने तिच्या बेबी बंपचा एक नवीन फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
अभिनेत्रीने यापूर्वी तिच्या इन्स्टा स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती पती आनंद आहुजासोबत दिसत आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये सोनम कपूरने लिहिले आहे की, पती आनंद आहुजासोबत रीयुनेटेड... म्हणजेच अभिनेत्री बऱ्याच दिवसांनी पतीला भेटत आहे. त्याच वेळी, इन्स्टास्टोरीच्या शेवटच्या स्टेट्समध्ये, अभिनेत्रीने तिचा काळ्या ड्रेसवरील एक फोटो शेअर केला आहे.
हा फोटो मिरर सेल्फी आहे, ज्यामध्ये अभिनेत्रीने एका हातात मोबाईल तर दुसरा हात बेबी बंपवर ठेवला ( Sonam Kapoor baby bump mirror selfie ) आहे. या मिरर सेल्फीला अभिनेत्रीने कोणतेही कॅप्शन दिलेले नाही. सोनम कपूर या वर्षी तिच्या पहिल्या मुलाला जन्म देणार आहे.
सोनम आणि आनंदने 2018 साली शाही पद्धतीने लग्न केले होते. अशा परिस्थितीत लग्नाच्या चार वर्षानंतर हे जोडपे पहिल्यांदाच पालक होणार आहेत. याआधी सोनम आणि आनंद त्यांच्या दिल्लीतील घरात कोट्यवधी रुपयांच्या चोरीमुळे चर्चेत आले होते.
पोलिसांनी या घटनेचा तपास करून लुटलेल्या साहित्यासह चोरट्यांना पकडले होती. ही चोरी इतर कोणी केली नसून घरातील केअर टेकरनेच ही चोरी केली होती. त्यावेळी आनंद आणि सोनम त्यांच्या मुंबईतील घरी होते.
हेही वाचा - शाहरुख खानच्या 'मन्नत' बंगल्याची नेमप्लेट गायब