ETV Bharat / entertainment

Sobhita Dhulipala shares stunning pictures : शोभिता धुलिपालाने बहिणीच्या 'नॉर्थ मीट्स साऊथ शादी'मधील जबरदस्त फोटो केले शेअर - नागा चैतन्याच्या डेटिंगची अफवा जोरदार

शोभिता धुलिपालाच्या बहिणीचे नुकतेच तिच्या प्रियकराशी लग्न झाले. अभिनेत्री शोभिताने तिच्या चाहत्यांना तिच्या सोशल मीडिया हँडलवर सुंदर लग्नाचे फोटो शेअर करत तिने नेसलेली साडी व लग्न विधीबद्दल बऱ्याच गोष्टी सांगितल्या.

'नॉर्थ मीट्स साऊथ शादी'मधील जबरदस्त फोटो

author img

By

Published : Apr 4, 2023, 3:51 PM IST

मुंबई - अभिनेत्री शोभिता धुलीपालाची बहीण समंता धुलिपालाने अलीकडेच दिल्लीतील डॉक्टर साहिल गुप्तासोबत लग्न केले. अभिनेत्री शोभिताने सोमवारी तिच्या बहिणीच्या लग्नातील अनेक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आणि त्यांच्या 'नॉर्थ मीट साऊथ' लग्नाबद्दल एक गोड नोट लिहिली. शोभिता धुलीपाला मूळची आंध्र प्रदेशमधील आहे.

बहिणीच्या लग्नात शोभिता धुलीपालाचा आनंद - इन्स्टाग्रामवर 'फेरे आणि मधुपरकालू' लग्नाच्या विधींची छायाचित्रे शेअर करताना शोभिताने विवाहाच्या विश्वासाला दुजोरा दिला आणि सांगितले की, तिच्या बहिणीने तिच्या आवडत्या माणसाशी लग्न करताना पाहणे भावनिक होते. ज्या समाजात लोक नेहमी एकमेकांशी मैत्री करत नाहीत, विशेषत: स्त्रिया, अशा समाजात बहीणभावाच्या फायद्यांचा आनंद लुटता येणे हा शोभितासाठी खूप आनंददायी आणि भावनिक अनुभव आहे. त्यामुळे तिचा वैवाहिक सौंदर्यावरचा विश्वासही परत आला आहे.

१२ तास विधी केल्यानंतरही आई नाराज - शोभिताने तिच्या कॅप्शनमध्ये लिहिले. 'वधू आणि वर हवनात उडी घेण्याच्या विचारात होते (हसणारे इमोजी). मला वाटते की हा सोहळा रात्रभर सुमारे १२ तास चालला आणि माझी आई अजूनही नाराज होती की आम्ही पुरेशी पूजा केली नाही, असे ती पुढे म्हणाली. काही फोटोंमध्ये वधूने लाल साडी नेसलेली दिसत आहे, तर काही फोटोंमध्ये तिने पांढऱ्या आणि किरमिजी रंगाच्या वधूचा वेष परिधान केला आहे.

शोभिताने परिधान केली गुलाबी साडी - शोभिताने तिच्या बहिणीच्या लग्नात कस्टमाइझ केलेली गुलाबी साडी नेसली होती. ळोभिताने वेगवेगळ्या पोझमध्ये स्वतःचे फोटो देखील शेअर केले आणि पोस्टला कॅप्शन दिले, मी लग्नात परिधान केली होती.. ही सुंदर साडी कस्टम-मेक केल्याबद्दल धन्यवाद! मला गुलाबासारखे वाटले'. तिच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना, एका चाहत्याने टिप्पणीमध्ये लिहिले, 'ज्यावेळी शोभिता पोस्ट करते तेव्हा तो चांगला दिवस असतो.' आजकाल शोभिता आणि नागा चैतन्याच्या डेटिंगची अफवा जोरदार आहे. त्यामुळे लवकरच ती आपल्या लग्नाचेही असेच फोटो शेअर करुन शकते याची चाहत्यांना खात्री आहे.

हेही वाचा - Tamannaah Bhatia Nickname : विजय वर्माने कथित गर्लफ्रेंडसाठी ठेवलेले टोपणनाव वाचून चाहत्यांची बत्ती गुल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.