ETV Bharat / entertainment

Sobhita Dhulipala on naga chaitanya : सामंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्यचे कौतुक करताना दिसली शोभिता धुलिपाला - rumored beau Naga Chaitanya

नागा चैतन्य आणि सामंथा रुथ प्रभू यांच्या सुखी संसारात मीठाचा खडा टाकल्याचा आरोप अभिनेत्री शोभिता धुलीपालावर होत होता. ती सध्या द नाईट मॅनेजर 2 च्या प्रमोशनमध्ये गुंतली असून यावेळी तिने नागा चैतन्य आणि सामंथाबद्दलची मते तिने व्यक्त केली आहेत. तिच्या आगामी मालिका द नाईट मॅनेजर 2 च्या प्रमोशन दरम्यान, शोभिता म्हणाली की नागा चैतन्य हा एक सभ्य स्वभावाचा माणूस आहे. तिला सामंथाबद्दल काय म्हणायचे आहे ते शोधण्यासाठी वाचा.

Sobhita Dhulipala on naga chaitanya
सामंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्यचे कौतुक
author img

By

Published : Jun 24, 2023, 1:26 PM IST

मुंबई - अभिनेत्री शोभिता धुलिपाला डिस्ने+ हॉटस्टारवर प्रसारित होणाऱ्या द नाईट मॅनेजर भाग -२ च्या प्रमोशनमध्ये गुंतली आहे. एका प्रमोशनल मुलाखतीदरम्यान, शोभिताने तिचा कथित प्रियकर नागा चैतन्य आणि त्याची माजी पत्नी समंथा रुथ प्रभू यांच्याबद्दलचे तिचे मत देखील शेअर केले. पोन्नियिन सेल्वन स्टार शोभिता धुलिपालाने असे गुण सांगितले जे तिला परक्या जोडप्यात सर्वात जास्त आवडतात.

शोभिता आणि नागा चैतन्यचा रोमान्स यापुढे त्यांच्या लंडन हॉलिडेच्या व्हायरल झालेल्या फोटोंमुळे जगासमोर आला आहे. या फोटोंनी मार्चमध्ये इंटरनेटवर धुमाकूळ घातला होता. लव्हबर्ड्सने नात्यात असण्याला नाकारले किंवा स्वीकारलेही नाही, तर शोभिताने नुकतेच एका मुलाखतीदरम्यान नागा चैतन्यबद्दल सांगितले. तिने नागा चैतन्यची माजी पत्नी सामंथाबद्दलही गौरवउद्गार काढले. सामंथाने यशोदा चित्रपटात केलेल्या भूमिकेचे तिने कैौतुक केले.

शोभिताने द नाईट मॅनेजर भाग -II प्रमोशनल स्पीचमध्ये नागा चैतन्यवर कौतुकाचा वर्षाव केला. त्याची सर्वात आवडणारी गोष्ट म्हणजे त्याचा स्वभाव असल्याचे तिने म्हटलंय. शोभिता आणि नागा चैतन्यचा कथित रोमान्सच्या गोष्टी सामंथापासून विभक्त झाल्यानंतर ठळकपणे चर्चेत आल्या आहेत. शोभिताला होम ब्रेकर म्हणून म्हटले गाले. नागा चैतन्य आणि सामंथाच्या सुखी संसारात मीठीचा खडा शोभितानेच टाकल्याचा आरोप चाहत्यांनी केला होता.

विशेष म्हणजे शोभिताने एकदा सांगितले होते की ती कधीही नागा चैतन्यला डेट करणार नाही. नंतर मात्र तिने तिचा विचार बदलला आहे असे दिसते. नागा चैतन्यशी डेटिंग करत असल्याचे न बोलताही शोभिताच्या भूमिकेतून दिसून येते.

द नाईट मॅनेजर ही डिस्ने प्लसवरील मालिकेचा दुसरा सिझन ३० जून पासून सुरू हणार आहे. या मालिकेच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता. याच्या कथानकाची सुरूवात बंग्लादेशमधून झाली होती आणि अखेरच्या भागात श्रीलंकेमध्ये काही थरारक गोष्टी घडतााना दिसल्या होत्या. आता या दुसऱ्या सिझनमध्ये कथानक जोरदार रंजक वळणावर आले असून अनेक थरराक गोष्टी यात घडताना पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा -

१. Ileana D'Cruz reveals : 'बाळाच्या हृदयाचे ठोके पहिल्यांदा ऐकले', इलियाना डिक्रूझने सांगितला अनुभव

२. Adipurush Box Office Collection Day 8 : आठव्या दिवशी ‘आदिपुरुष’या चित्रपटाच्या कमाईत झाली फार मोठी घसरण

३. poster of Dha Lekacha : ‘ढ लेकाचा’ पोहोचला पंढरपुरात विठ्ठलाच्या दारी!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.