मुंबई - Singham Again : सिंघम फ्रँचायझीचा तिसरा भाग 'सिंघम अगेन' लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटासाठी रोहित शेट्टी खूप उत्सुक आहे. 'सिंघम अगेन' या अॅक्शन चित्रपटातील स्टार कास्टचे एकामागून एक फर्स्ट लूक रिलीज करण्यात येत आहेत. आता अजय देवगणच्या 'सिंघम अगेन'मधील फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. अजय देवगणच्या लूकची वाट चाहते खूप आतुरतेनं पाहत होते. अजय देवगणचं फर्स्ट लूक शेअर करताना रोहित शेट्टीनं लिहलं, 'शेर आतंक मचाता है और जख्मी शेर तबाही. सबका फेवरेट पुलिसवाला, बाजीराव सिंघम वापस येत आहे. सिंघम अगेन'. अजय देवगण रिलीज केलेल्या फोटोत उग्र अवतारात दिसतोय. याशिवाय फोटोमध्ये सिंहाची देखील झलक दाखविण्यात आली आहे.
अजय देवगणचा फर्स्ट लूक : सिंघम अगेनमधील अजय देवगणचा फर्स्ट लूक पाहून चाहत्यांमध्ये उत्साह निर्माण झालाय. रोहित शेट्टीनं शेअर केलेल्या पोस्टवर अनेकजण कमेंट करत आहेत. एका यूजरनं पोस्टवर कमेंट करत लिहलं, 'सुपर सर'. याशिवाय यावर त्यानं फायर इमोजी पोस्ट केले. दुसर्या एका चाहत्यांन लिहलं, 'आता प्रतीक्षा करू शकत नाही, हा चित्रपट सुपरहिट होईल'. आणखी एकानं लिहलं, 'अजय देवगणचा हा लूक खूप खास आहे' अशा अनेक कमेंट या पोस्टवर येत आहेत. याशिवाय काहीजण या पोस्टवर फायर आणि हार्ट इमोजी पोस्ट करत आहेत. 'सिंघम अगेन'चं दिग्दर्शन रोहित शेट्टीनं केलंय. सिंघम फ्रँचायझीचा हा तिसरा चित्रपट आहे. या चित्रपटात अजय देवगण बाजीराव सिंघमच्या भूमिकेत दिसणार आहे.
सिंघम अगेन चित्रपटाची स्टार कास्ट : 'सिंघम अगेन'मध्ये अजय देवगण व्यतिरिक्त करीना कपूर, रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, टायगर श्रॉफ आणि अक्षय कुमार हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. 'सिंघम अगेन'च्या रिलीज डेटबद्दल बोलायचं झालं तर हा चित्रपट १५ ऑगस्ट २०२४ रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटात विकी कौशलची व्यक्तिरेखाही असल्याचं बोललं जातंय. अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २' चित्रपट देखील या दिवशी रिलीज होणार आहे. या दोन्ही चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर टक्कर पाहणं लक्षणिय ठरणार आहे.
हेही वाचा :