मुंबई - एक लोकप्रिय म्यूझिक शो म्हणजे इंडियन आयडॉल आता १४ व्या पर्वात दाखल होत आहे. या नव्या पर्वात भारताची अव्वल गायिका श्रेया घोषाल इंडियन आयडॉलच्या परीक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे, हे आपण यापूर्वी वाचले असेल. विशेष म्हणजे श्रेया यांच्या कारकिर्दीची सुरुवात इंडियन आयडॉलच्या कॉन्टेस्टन्ट असण्यापासून झाली आहे.
याविषयी बोलतानाश्रेया घोषाल म्हणाली की, 'मी स्वतःला भाग्यवान समजते की ज्या शोमध्ये एक स्पर्धक म्हणून माझ्या कारकिर्दीची सुरुवात झाली, त्याच शोसाठी मी परीक्षक म्हणून निवडली गेली आहे. हा प्रवास जरी सुखदायक वाटत असला तरी तो कष्टसाध्य होता. परंतु माझ्या कष्टांचे चीज झाले असे वाटते आणि कष्टाचे फळ देणारा हा शो आहे असे मला वाटते. या शोमध्ये स्पर्धक म्हणून सुरुवात करण्यापासून ते आता परीक्षक म्हणून काम करण्यापर्यंतचा माझा प्रवास प्रेरणादायी असून मला उत्साहित करणारा आहे.'
इंडियन आयडॉल शो ने भारतीय संगीत क्षेत्राला अनेक गुणी गायक गायिका दिले आहेत. आतासुद्धा याचे नवीन पर्व आपल्या देशातील उगवत्या गायकांच्या शोधात आहे जे आपल्या आवाजाने समस्त देशाला मोहित करण्याची क्षमता बाळगतात. सोनू निगम, विशाल ददलानी आणि श्रेया घोषाल असे संगीत क्षेत्रातील नामवंत परीक्षकांच्या खुर्चीत बसणार आहेत त्यामुळे प्रेक्षकांना सर्वोत्तम सांगीतिक मेजवानी अनुभवायला मिळणार हे नक्की.
लोकप्रिय गायिका श्रेया घोषाल म्हणाली की, 'मी उत्साहाने इंडियन आयडॉलच्या परीक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे परंतु माझे काम सोपे नसणार आहे याची मला पूर्ण कल्पना आहे. खरंतर मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. याआधी मी इंडियन आयडॉल ज्युनियरमध्ये परीक्षक म्हणून काम केले होते आणि त्यातील अनुभव मोलाचा होता. मला आनंद आहे की संगीत विश्वातील माझे लाडके सहकारी म्हणजेच सोनू निगम आणि विशाल ददलानी माझ्यासोबत परीक्षक म्हणून असणार आहेत. इंडियन आयडॉल ज्युनियरमध्ये लहानग्या गायकांना पैलू पाडण्याचे कार्य माझ्या हातून घडले आणि आता मोठ्या गायकांना मार्गदर्शन करताना त्यांच्या संगीत प्रवासाची साक्षीदार होण्याचा आनंद मला मिळणार आहे.'
त्यातील पुढे म्हणाल्या की, 'मी स्वतः एक स्पर्धक म्हणून या शो चा अनुभव घेतला आहे. सोनू जी देखील एक स्पर्धक म्हणून एका संगीत कार्यक्रमाचा हिस्सा होते. विशाल सरांना दांडगा अनुभव आहे त्यामुळे या कार्यक्रमात स्पर्धकांना उत्तम कामगिरी करण्याशिवाय पर्याय नाहीये. त्यांनी एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे की हा मंच त्यांना राष्ट्रीय स्तरावर घेऊन जाणार आहे आणि संगीत क्ष्रेत्रातील मान्यवर हा कार्यक्रम फॉलो करतात. मी परीक्षक म्हणून या शोमध्ये वाटचाल सुरू करण्यासाठी मी उत्सुक आहे.' इंडियन आयडॉल सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर येण्यासाठी सज्ज होत आहे.
हेही वाचा -
१. Ajay Devgan : अजय देवगण 'दे दे प्यार दे'चा सीक्वलसाठी झाला सज्ज...
३. Gadar 2 vs OMG 2 box office day 19: बॉक्स ऑफिसवर 'गदर 2' करत आहे राज्य...