ETV Bharat / entertainment

sidharth kiara wedding : सिद्धार्थ कियाराच्या लग्नासाठी सेलेब्रिटी वऱ्हाडींची लगीनघाई - Siddharth Kiaras wedding

कियारा आणि सिद्धार्थच्या लग्नाला वऱ्हाडी मंडळी पोहोचत आहेत. आज बॉलिवूड संगीतकार आणि गायक विशाल दादलानी, निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर, बॉलिवूड स्टार शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा तसेच कियाराची बालपणीची मैत्रीण ईशा अंबानी जैसलमेरला पोहोचली आहे. कोणीही सेलेब्रिटी सूर्यगढ पॅलेसमध्ये दाखल होत असताना त्यांचे पारंपरिक राजस्थानी पद्धतीने स्वागत करण्यात येते. स्थानिक लोकगीते यांचा वापर होत असून लोककलाकारही आपले परफॉर्मन्स सादर करत आहेत.

sidharth kiara wedding
sidharth kiara wedding
author img

By

Published : Feb 6, 2023, 5:29 PM IST

जयपूर - बॉलिवूड सेलेब्रिटी कपल सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांच्या लग्नाच्या विधींना सुरुवात झाली आहे. रविवारी सिद्धार्थच्या नावाची मेहंदी कियाराच्या हातावर लावण्यात आली होती. त्याचबरोबर त्यांचा हळदी समारंभ 6 फेब्रुवारीला पार पडणार आहे. आपण पूर्वी सिद्धार्थ आणि कियाराचे लग्न ६ फेब्रुवारीला होणार असल्याचे ऐकले आणि वाचले होते. पण आता तसे नाही. तर जोडपे ७ फेब्रुवारीला लग्न करणार आहेत. यासाठी बॉलिवूड सेलेब्रिटी जैसलमेरमध्ये दाखल होत आहेत. आज करण जोहर, मीरा कपूर आणि शाहिद कपूर दाखल झाले आहेत.

जैसलमेर विमानतळाबाहेर पापाराझींची मोठी गर्दी - कियारा आणि सिद्धार्थच्या लग्नाला वऱ्हाडी मंडळी पोहोचत आहेत. आज बॉलिवूड संगीतकार आणि गायक विशाल दादलानी दाखल झाला. त्यापाठोपाठ धर्मा प्रॉडक्शनचा सर्वेसर्वा निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर याची एन्ट्री झाली. त्याच्यासोबत बॉलिवूड स्टार शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीराही होते. त्यांचे फोटो काढण्यासाठी पापाराझीही मोठ्या संख्येने इथे आल्याचे दिसते.

करण जोहर आणि शाहिद कपूर जैसलमेरमध्ये दाखल - करण आणि शाहिदला पाहून विमानतळाबाहेर त्यांना कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी पापाराझींची मोठी धांदल उडाली. करणने शांतपणे त्यांच्याकडे पाहात आपल्या गाडीमध्ये जाणे पसंत केले. त्यापाठोपाठ शाहिदही गेला. परंतु करणच्या गाडीत न बसता त्याने मीरासह दुसरी गाडी पकडली. याठिकाणी सुरक्षा व्यवस्था इतकी तगडी आहे की पापाराझींना सेलेब्रिटींच्या मुव्हमेंट्सही कॅप्चर करणे मुश्कील झाले आहे.

कियाराची बालपणीची मैत्रीण ईशा अंबानी जैसलमेरमध्ये - या जोडप्याच्या लग्नाला हजेरी लावण्यासाठी बॉलिवूडचे अनेक स्टार्स जैसलमेरला पोहोचले आहेत. रविवारी रात्री बॉलीवूड अभिनेत्री कियाराची बालपणीची मैत्रीण ईशा अंबानी तिच्या पतीसोबत जैसलमेरला पोहोचली, जिथे पापाराझींनी तिला कॅमेऱ्यात कैद केले. कोणीही सेलेब्रिटी सुर्यगढ पॅलेसमध्ये दाखल होत असताना त्याचे पारंपरिक राजस्थानी पद्धतीने स्वागत करण्यात येते. स्थानिक लोक गीते यांचा वापर होत असून लोककलाकारही आपले परफॉर्मन्स करत आहेत.

नो फोन पॉलिसी - सिद्धार्थ-कियारा यांनी त्यांच्या लग्नाच्या फंक्शनमध्ये 'नो फोन पॉलिसी'ची घोषणा केली. या जोडप्याने त्यांच्या पाहुण्यांना आणि हॉटेल कर्मचार्‍यांना सोशल मीडियावर फोटो शेअर करू नका असे सांगितले आहे. सिद्धार्थ आणि कियारा लग्नाचे पहिले फोटो पोस्ट करणार आहेत. राजस्थान सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांच्या आणखी एका स्टार लग्नाचे साक्षीदार होण्यासाठी सज्ज झाले आहे, 2023 मध्ये वाळवंटातील हे पहिले बॉलिवूड लग्न आहे.

हेही वाचा - sidharth kiara wedding : सिद्धार्थ कियाराचे लग्न 6 फेब्रुवारीला नसून होणार 'या' तारखेला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.