ETV Bharat / entertainment

Short and sweet Movie : 'शॉर्ट अँण्ड स्वीट’मध्ये झळकणार सोनाली कुलकर्णीचे आई-बाबा... - शॅार्ट अँड स्वीट चित्रपट

Short and sweet Movie : दिनकर कदम दिग्दर्शित ‘शॅार्ट अँड स्वीट’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात मुख भूमिकेत सोनाली कुलकर्णी दिसणार आहे. यासह या चित्रपटामध्ये तिचे आई-बाबा देखील झळकणार आहेत.

Short and sweet Movie
शॉर्ट अँण्ड स्वीट चित्रपट
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 31, 2023, 3:00 PM IST

मुंबई - Sonali kulkarni : गणेश दिनकर कदम दिग्दर्शित ‘शॅार्ट अँड स्वीट’ या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, हर्षद अतकरी, श्रीधर वत्सर आणि रसिका सुनील यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘शॅार्ट अँड स्वीट’ चित्रपटामध्ये आणखी दोन नवोदित कलाकार झळकणार आहे. हे कलाकार कोण आहेत हा प्रश्न पडला ना? तर हे नवोदित कलाकार आहेत सोनाली कुलकर्णीचे आई - बाबा. या चित्रपटाद्वारे ते दोघेही रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत. दरम्यान, सोनालीचे चाहते तिच्या आई आणि बाबांना पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत. या चित्रपटाची शुटिंग पुण्यात होत असल्यानं सोनालीचे आई-बाबा तिला सेटवर भेटायला गेले होते.

सोनालीचे आई-बाबा झळकणार चित्रपटात : सोनालीचे आई-बाबा पुण्यात असल्यानं दिग्दर्शकांनी त्यांना अभिनय करण्याची संधी दिली. दिग्दर्शकांनी दिलेल्या संधीला मान देत त्यांनीही अभिनय करण्याची संधी स्विकारली. ‘शॅार्ट अँड स्वीट’ चित्रपटात सोनालीचे आई आणि बाबा सहप्रवाशाच्या भूमिकेत दिसणार आहेत. दरम्यान, या चित्रपटामधील बसमधील प्रवास करतानाचा सीन चित्रीत करण्यात आला आहे. या चित्रपटाद्वारे आपल्या मुलीसोबत काम करण्याचा आनंद काही औरच आहे, अशा शब्दांत सोनलीच्या आई-बाबांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. याशिवाय सोनालीनंही आपल्या आईबाबांसोबत काम करण्याचा अनुभव खास असल्याचं म्हटलं आहे.

'शॅार्ट अँड स्वीट’ चित्रपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला : शुभम प्रॉडक्शन निर्मित या चित्रपटाचे पायल गणेश कदम, विनोद राव निर्माते आहेत. हा चित्रपट येत्या 3 नोव्हेंबरपासून चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. ‘शॅार्ट अँड स्वीट’ हा चित्रपट या कौटुंबिक आहे. सोनालीनं या सिनेमाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर करत फोटोवर लिहिलं, 'या जगात आपली खरी ताकद आणि खरी ओळख आपले कुटुंब आहे, जे आपल्याला आयुष्यात प्रत्येक कठीण परिस्थितीशी लढण्याची, सामोरे जाण्याची शक्ती देते'. याशिवाय तिनं पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहलं, 'सहकुटुंब, सहपरिवार एकत्र आनंद घ्या. या गोड सरप्राईजचा 'शॉर्ट ॲण्ड स्वीट' येतोय. फक्त 4 दिवसात प्रेक्षकांच्या भेटीला 3 नोव्हेंबरपासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात!'. सोनालीच्या या पोस्टवर अनेकजण तिचं कौतुक करत आहे. याशिवाय काहीजण हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करत आहेत.

हेही वाचा :

  1. Ankita Lokhande broke silence : सुशांत सिंह राजपूतसोबत ब्रेकअपच्या विषयावर अंकिता लोखंडेनं सोडलं मौन
  2. Urfi Javed receives death threat : उर्फी जावेदला जीवे मारण्याची मिळाली धमकी ; शेअर केली पोस्ट
  3. Angad Bedi dedicates gold medal : अंगद बेदीनं अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमधील सुवर्णपदक वडील बिशन सिंग बेदींना केलं समर्पित

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.