ETV Bharat / entertainment

रणवीरच्या न्यूड फोटोवरुन दीपिका पदुकोणवर भडकली शर्लिन चोप्रा - शर्लिन चोप्राचा रुबाब

शर्लिन चोप्राने ( Sherlyn Chopra ) लहान कपडे घातले होते तेव्हा दीपिका पदुकोणने चेहरा विचीत्र केला होता, मग आता तिच्या नवऱ्याने तर कपडे न घालताच फोटो कसे शूट केलेत असा सवाल शर्लिनने दीपिकाला केला आहे.

दीपिका पदुकोणवर भडकली शर्लिन चोप्रा
दीपिका पदुकोणवर भडकली शर्लिन चोप्रा
author img

By

Published : Jul 28, 2022, 11:17 AM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगचे न्यूड ( Ranveer Sing nude photo ) फोटोशूट त्याच्यासाठी तापदायक ठरत आहेत. सोशल मीडियावर महिलांनी अभिनेत्याविरोधात आघाडी उघडली असून आता अभिनेत्री शर्लिन चोप्रानेही ( Sherlyn Chopra ) थेट रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणवर ( Deepika Padukone ) निशाणा साधला आहे. या प्रकरणी रणवीर सिंग विरोधात यापूर्वीच एफआयआर दाखल झाली असून आता शर्लिनने दीपिकाला प्रश्नांच्या भोवऱ्यात उभे केले आहे. एकदा दीपिकाने शर्लिनच्या ड्रेसबद्दल विचित्र एक्सप्रेशन दिले होते, त्या प्रसंगाचा संदर्भ देत तिने काही प्रश्न विचारले आहेत.

शर्लिनने दीपिकावर दाखवला रुबाब - मुंबईतील एका एनजीओने न्यूड फोटोशूटद्वारे महिलांच्या भावना दुखावल्याप्रकरणी रणवीर सिंहविरोधात एफआयआर दाखल केली आहे. दरम्यान, मॉडेल आणि अभिनेत्री शर्लिन चोप्राची मुलाखत व्हायरल होत आहे.

मीडियानुसार शर्लिनने मुलाखतीत दीपिका पदुकोणला टोमणा मारला आहे. शर्लिनने दावा केला आहे की, एकदा दीपिकाने तिच्या ड्रेसबद्दल विचित्र एक्सप्रेशन दिले होते. शर्लिन चोप्रा म्हणाली, 'जेव्हा मी एका आंतरराष्ट्रीय मासिकासाठी बोल्ड शूट केले, तेव्हा समाजाने मला चारित्र्यहीन आणि इतर अनेक नावांनी संबोधले. या दोन गोष्टी कशासाठी? हा दांभिकपणा कशासाठी? मी जेव्हा शूट केले तेव्हा माझ्या अंगावर किडे पडले होते का?'

शर्लिनचा भडकली - एवढेच नाही तर शर्लिन चोप्रा भडकली आणि पुढे म्हणाली- "हे सर्व चालतं असं म्हणू नका, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, त्यावेळी दीपिका पदुकोण माझ्याकडे खालपासून वरपर्यंत पाहात विचार करत होती की एवढी छोटी चड्डी, एवढासा टॉप, आभार मान की मी शरीरावर काहीतरी घातले होते, तुमच्या नवऱ्याच्या शरीरावर काय आहे मॅडम? काहीच नाही."

दीपिका पदुकोणवर भडकली शर्लिन चोप्रा
दीपिका पदुकोणवर भडकली शर्लिन चोप्रा

फोटो व्हायरल करू नका - शर्लिनने ट्विट करत लिहिले आहे की, रणवीर सिंगचे न्यूड फोटो व्हायरल करू नका. असे केल्याने तुम्ही इतरांना मानसिक आघातापासून वाचवू शकता, या कठीण काळात आपण रणवीर (कपडे परिधान करून) सोबत उभे राहिले पाहिजे.

अर्जुन कपूर, राम गोपाल वर्मा आणि जॉन अब्राहम यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी या प्रकरणात रणवीर सिंगचे समर्थन केले आहे. वास्तविक, जॉनने त्याचे न्यूड फोटोशूटही शेअर केले होते.

हेही वाचा - ‘टाइमपास ३’ टीमच्या सोबत रिक्षाचालकांनी दिली ‘वाघाची डरकाळी'!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.