मुंबई - बॉलिवूडचा देखणा आणि उगवता अभिनेता कार्तिक आर्यनने त्याच्या 32 व्या वाढदिवसानिमित्त बहुप्रतिक्षित चित्रपट 'शेहजादा'चा टीझर रिलीज करून त्याच्या चाहत्यांना एक मोठी रिटर्न गिफ्ट दिली आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत आणि आता टीझर पाहिल्यानंतर ही प्रतीक्षा आणखी उत्कंठावर्धक होऊ शकते. टीझरमध्ये कार्तिक आर्यनचा मस्त स्टाइल आणि फुल अॅक्शन पाहायला मिळत आहे. 'शेहजादा'चे दिग्दर्शन अभिनेता वरुण धवनचा भाऊ रोहित धवन करत आहे. 'शेहजादा' हा चित्रपट साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनचा सुपरहिट चित्रपट आला वैकुंठपुरमलोचा अधिकृत हिंदी रिमेक आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
कसा आहे 'शेहजादा'चा टीझर? - 'शेहजादा'चा एक मिनिटापेक्षा कमी कालावधीचा टीझर कार्तिक आर्यनच्या स्वॅग, अॅक्शन आणि मस्तीने परिपूर्ण आहे. यासोबतच बॉलीवूडची 'अल्टीमेट ब्युटी' क्रिती सॅनन ग्लॅमरची छटा जोडताना दिसत आहे. टिझरमध्ये कार्तिक आर्यन अल्लू अर्जुन स्टाईलमध्ये गुंडांना मारहाण करत असल्याचे दिसत आहे. टीझरसोबतच चित्रपटाची रिलीज डेटही समोर आली आहे. व्हॅलेंटाईन डे दरम्यान 10 फेब्रुवारी 2023 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
कार्तिकचा वर्कफ्रंट - वर्क फ्रंटवर, कार्तिक सध्या कियारा अडवाणीसोबत 'सत्यप्रेम की कथा' या संगीतमय रोमँटिक गाथा चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर विध्वंस करत आहेत. हा चित्रपट 29 जून 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. याशिवाय कार्तिक 'फ्रेडी' या रोमँटिक थ्रिलर चित्रपटात अभिनेत्री आलिया एफसोबत दिसणार आहे. हा चित्रपट 2 डिसेंबर 2022 पासून OTT प्लॅटफॉर्म Disney + Hotstar वर विशेष प्रवाहित होईल. याशिवाय हेरा-फेरी-3, शहजादा आणि आशिकी-3 हे देखील कार्तिकच्या बॅगमध्ये आहेत.
हेही वाचा - छत्रपती शिवाजी महाराजांवर भव्य चित्रपट बनवणार राज ठाकरे, तीन भाग बनवण्याची इच्छा