ETV Bharat / entertainment

शहनाज गिलचे सिद्धू मूसवालाच्या गाण्यावर रॅम्प वॉक पदार्पण - पाहा व्हिडिओ - शहनाज गिल लेटेस्ट बातमी

शहनाज गिलने ( Shehnaaz Gill ) रविवारी डिझायनर सामंत चौहानसाठी ( Samant Chauhan ) रॅम्पवर जबरदस्त पदार्पण केले. वधूचा लाल लेहेंगा घालून अभिनेत्रीने रॅम्प वॉक केला तर पार्श्वभूमीत दिवंगत सिद्धू मूसवालाचे ( Sidhu Moosewala's song ) सोहने लगदे हे गाणे वाजत होते.

शहनाज गिल
शहनाज गिल
author img

By

Published : Jun 20, 2022, 1:46 PM IST

मुंबई - नववधूच्या पोशाखात पहिल्यांदाच रॅम्पवर चालताना शहनाज गिल ( Shehnaaz Gill ) जबरदस्त आकर्षक आणि खूपच सुंदर दिसत होती. लाल रंगाच्या सामंत चौहान लेहेंग्यात ( Samant Chauhan Lehenga ) अतिशय सुंदर दिसत असलेल्या शहनाजने सर्वांची मनं जिंकली. तिने फॅशन शोची शोस्टॉपर म्हणून आत्मविश्वासाने चालायला सुरुवात केली आणि नंतर सिद्धू मूसवालाच्या सोहने लगदे या गाण्यावर मनापासून नृत्य केले.

शहनाजने इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आव्हिडिओ शेअर केला आणि लिहिले, "पदार्पणाचा वॉक योग्य रितीने केला. सुपर टॅलेंटेड डिझायनर संपत चौहानसाठी वॉक केला. आमच्यासाठी हे खास बनवल्याबद्दल अहमदाबादच्या लोकांचे आभार! तुमचा आदरातिथ्य आणि प्रेम अतुलनीय आहे.शहनाज गिल".

तिच्या रॅम्प पदार्पणासाठी तिची प्रशंसा करताना चाहत्यांनी भरपूर कमेंट केल्या आहेत. एका चाहत्याने लिहिले, "सर्वात सुंदर पंजाबी वधू # शहनाझ गिल". दुसर्‍याने लिहिले, "सर्वात सुंदर शोस्टॉपर, तेजस्वी ताऱ्याप्रमाणे चमकत राहा, शेहनाज". एका इंस्टाग्राम वापरकर्त्याने अशाच भावनांना प्रतिध्वनित केले आणि लिहिले, "मला तुझा खूप अभिमान आहे गिल, तू तुझा पहिला रॅम्प सुरळीत केला".

कामाच्या आघाडीवर शहनाज गिल पंजाबी चित्रपट होंसला रखमध्ये दिलजीत दोसांझसोबत झळकली होती. ती लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची माहिती आहे. शहनाजची अभिनेता सलमान खानशी जवळीक असल्यामुळे, ती त्याच्या पुढच्या 'कभी ईद कभी दिवाली' या चित्रपटात दिसणार असल्याचा अंदाज चाहत्यांनी बांधला आहे. या चित्रपटात पूजा हेगडे मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

हेही वाचा - प्रियंका चोप्राने पती निकला दिली 'फादर्स डे'चे अनोखी भेट!!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.