ETV Bharat / entertainment

Shehnaaz Gill in Kapil Sharma show : शहनाज गिलने सलमान खानचा नंबर अनब्लॉक केला..मग मिळाली मोठी ऑफर - किसी का भाई किसी की जान

शहनाज गिलने कबूल केले की तिने चुकून एकदा सलमान खानचा फोन नंबर ब्लॉक केला होता. नंतर तो नंबर कोणाचा आहे हे लक्षात येताच तिने अनब्लॉक करून परत डायल केला.

Shehnaaz Gill in Kapil Sharma show
सलमान खानचा नंबर ब्लॉक केल्याचा केला खुलासा
author img

By

Published : Apr 14, 2023, 2:10 PM IST

हैदराबाद: बॉलिवूड अभिनेत्री शहनाज गिल अलीकडेच द कपिल शर्मा शोमध्ये किसी का भाई किसी की जानच्या कलाकारांसह तिच्या नवीन चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हजर झाली. शोमध्ये शहनाजने बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचा कॉन्टॅक्ट नंबर ब्लॉक केल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे. 'किसी का भाई किसी की जान'मध्ये भूमिकेची ऑफर येण्यापूर्वी तिने सलमानचा मोबाइल नंबर ब्लॉक केला होता, असे या अभिनेत्रीने सांगितले.

अनोळखी कॉलरला ब्लॉक करण्याची सवय : या घटनेवर प्रकाश टाकताना ती म्हणाली, मी नुकतीच अमृतसरला पोहोचले होते आणि गुरुद्वाराकडे जात असताना मला एका अनोळखी नंबरवरून कॉल आला. मला अनोळखी कॉलरला ब्लॉक करण्याची सवय आहे. त्यामुळे मी लगेचच नंबर ब्लॉक केला. त्यानंतर काही वेळाने मला मेसेज आला की सलमान सर माझ्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत.

खरोखर सलमान सरांचा नंबर : ती पुढे म्हणाली, मी खात्री करण्यासाठी Truecaller अॅपमध्ये नंबर टाकून पडताळणी केली आणि मला कळले की तो खरोखर सलमान सरांचा नंबर होता. मग, मी त्यांना अनब्लॉक केले आणि त्यांचा नंबर पुन्हा डायल केला, त्यानंतर त्यांनी मला कॉल केला आणि त्यामुळेच मला हा चित्रपट मिळाला.

पहिल्या व्हिडिओ सॉंगसाठी नकार : सलमान खान स्टारर या चित्रपटात शहनाज, पूजा हेगडे, पलक तिवारी, जस्सी गिल, राघव जुयाल, विनाली भटनागर, सिद्धार्थ निगम आणि सुखबीर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला, शहनाजने उघड केले की तिला भूतकाळात नकाराचा सामना करावा लागला होता कारण तिला सुरुवातीला तिच्या पहिल्या संगीत व्हिडिओसाठी नकार देण्यात आला होता, परंतु सलमानने तिच्यावर विश्वास दाखवला.

सलमान सरांनी मला संधी दिली : 'जेव्हा मी माझ्या पहिल्या म्युझिक व्हिडिओच्या सेटवर गेले होते तेव्हा मला नकार देण्यात आला होता. आम्हाला तिच्यासोबत शूट करायचे नाही, त्यांने अशी कमेंट केली, 'ये कौनसी बच्ची लेके आये हैं.' किसी का भाई किसी की जानच्या ट्रेलर लॉन्चवेळी शहनाजने याबद्दल बोलले. 'मी परत आले आणि घरी खूप रडले, मला नाकारल्यासारखे वाटले. माझी आईने मला समजावले, तू रडू नकोस... एक दिवस तू सलमान खानच्या चित्रपटात नक्की दिसणार आहेस. सलमान सरांनी मला संधी दिली आणि आईची भविष्यवाणी नेहमीच खरी असते हे सिद्ध केले.

हेही वाचा : Malaika Arora With Arjun Kapoor : अर्जुन कपूरसोबत अज्ञात स्थळी रवाना झालेल्या मलायकाने दिली उपडेट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.