मुंबई - अभिनेत्री तृप्ती खामकर लवकरच 'गोविंदा नाम मेरा' या आगामी स्ट्रीमिंग चित्रपटात दिसणार आहे, जेव्हा तिने या चित्रपटातील तिच्या भूमिकेसाठी चित्रपटाचे दिग्दर्शक शशांक खेतान यांची भेट घेतली तेव्हा एक मजेदार घटना घडली.
ऑडिशन्सनंतर दिग्दर्शक शशांक खेतान जेव्हा तृप्तीला भेटला तेव्हा आश्चर्यचकित झाला. त्याचे झाले असे की तृप्तीने गृहिणीची ऑडिशन दिली होती आणि त्यात ती छान दिसली होती. पण आता जेव्हा शशांक खेतानला भेटायला आली तेव्हा ती शहरी पोशाखात होती. शशांक यांच्या डोक्यात तिची गृहिणीची प्रतिमाच बसली होती. त्यामुळे ती समोर येताच त्यांचा गोंधळ झाला. आपण ऑडिशनमध्ये पाहिलेली व्यक्ती हीच आहे यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता.
दिग्दर्शकासोबतची तिची पहिली भेट आठवताना, अभिनेत्री तृप्ती खामकर म्हणाली, "शशांकची भेट खूप मजेदार होती. मी ऑडिशन दिल्यानंतर त्यांनी मला भेटण्यासाठी धर्मा प्रॉडक्सनच्या कार्यालयात बोलावले आणि मी नेहमीप्रमाणे कपडे घातले होते व पायात बुट होते. शशांक जेव्हा खोलीत आले तेव्हा ते आश्चर्यचकित झाले, कारण त्याने माझे ऑडिशन पाहिले होते आणि मी ग्लॅमरस असेल अशी अपेक्षा केली नव्हती. त्यांना सलवार कमीज (भारतीय पोशाख) मधील एका मुलीची अपेक्षा होती."
ती पुढे म्हणाली, "त्यांनी विचारले, मंजू (चित्रपटात मी साकारलेली व्यक्तिरेखा) कुठे आहे? मी म्हणाले, ती घरी आहे आणि मला सांगण्यात आलंय की तुम्हाला मला भेटायचे आहे. आम्ही बोलू लागलो तेव्हा ते म्हणाले, तू पूर्ण बांद्रा गर्ल वाटत आहेस. तू भूमिका कशी साकारणार आहेस? व्यक्तीरेखेत तू खूप खरी दिसतेस पण आता तू पूर्णपणे विरुद्ध आहेस. एक अभिनेत्री म्हणून मला मिळालेली हीच सर्वात मोठी प्रशंसा आहे." संपूर्ण शूटिंगदरम्यान शशांक खेतान हे तृप्तीला बांद्रा गर्ल म्हणत चिडवत राहिले.
तृप्ती खानमकर ही अभिनेत्री 'तुम्हारी सुलू', 'गधेडो: डॉन्की', पहिला मराठी झोम्बी चित्रपट 'झोम्बिवली' आणि 'गिरगिट' आणि 'गर्ल्स हॉस्टेल' सारख्या ओटीटी शोजसाठी ओळखली जाते. 'गोविंदा नाम मेरा' चित्रपट 16 डिसेंबर रोजी डिस्ने + हॉटस्टारवर प्रदर्शित होईल.
हेही वाचा - झुंबरमध्ये विद्युत बल्ब!! छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील अक्षय कुमारचा फर्स्ट लूक ट्रोल