ETV Bharat / entertainment

sharad kelkar birthday special : शरद केळकरनं संघर्षानं निर्माण केलं चित्रपटसृष्टीत नाव... - शरद केळकरचा वाढदिवस

sharad kelkar birthday special : शरद केळकर हे अल्पावधीत घराघरात पोहोचलेलं नाव आहे. आज तो आपला 47वा वाढदिवस साजरा करतोय.या खास प्रसंगी त्याच्याबद्दल काही खास गोष्टी जाणून घेण्यासाठी वाचा...

sharad kelkar birthday specia
शरद केळकर बर्थडे स्पेशल
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 7, 2023, 10:21 AM IST

Updated : Oct 7, 2023, 12:37 PM IST

मुंबई - sharad kelkar birthday special : शरद केळकरनं आपल्या मेहनतीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्थान निर्माण केलं आहे. त्यानं आपल्या अभिनय करिअरची सुरुवात छोट्या पडद्यापासून केली. 7 ऑक्टोबर 1976 रोजी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे जन्मलेल्या शरद केळकरला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. शरद केळकर एक उत्कृष्ट अभिनेता असण्यासोबतच एक उत्कृष्ट व्हॉईस ओव्हर कलाकार देखील आहे. आज बर्थडे स्पेशलमध्ये आम्ही तुम्हाला शरद केळकरच्या आयुष्यातील काही खास गोष्टी सांगणार आहोत.

शरदचं बालपण : शरद हा मूळचा छत्तीसगडमधील जगदलपूरचा आहे, मात्र त्याचे संपूर्ण बालपण ग्वाल्हेरमध्ये गेलं. त्याचं महाविद्यालयीन शिक्षणही ग्वाल्हेरमधूनच झालं. तो अभ्यासात खूप हुशार होता. त्यांनी मार्केटिंगमध्ये एमबीए केले. शरदला अभिनयाची खूप आवड होती. मुंबईत जाऊन बॉलिवूडमध्ये नाव कमावण्याचं त्याचं स्वप्न होतं. शरद आपल्या चुलत भावाला भेटायला मुंबईत आला, तेव्हा त्याच्या चांगल्या लूकमुळे त्याला रॅम्पवर चालण्याची ऑफर मिळाली. यानंतर शरदनं ग्लॅमरच्या दुनियेत आपला प्रवास सुरू केला. त्यानं आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात ही दूरदर्शनच्या 'आक्रोश' मालिकेतून केली. त्यानंतर त्यानं 'सीआयडी', 'उतरन' 'सिंदूर', 'सात फेरे' आणि 'रात होने को है' अशा अनेक मालिकेत काम केलं. याशिवाय त्यानं 'रॉक-एन-रोल', 'सारेगामापा चॅलेंज', 'पती-पत्नी और वो' यासारखे शो होस्ट केले.

शरद केळकरनं 'या' हिट चित्रपटांमध्ये काम केले : मालिकेमध्ये काम केल्यानंतर शरदनं बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. 'हलचल' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर त्यानं '1920: इव्हिल रिटर्न्स', 'गलियों की रासलीला', 'सरदार गब्बर सिंग','तान्हाजी', 'अ पेइंग घोस्ट','मोहेंजो दारो' यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये काम करून बॉलिवूडमध्ये आपली जागा कायम केली. शरदनं हिंदी चित्रपटांव्यतिरिक्त मराठी आणि तेलुगू चित्रपटांमध्येही काम केलं आहे. शरद केळकरनं 'बाहुबली' चित्रपटाच्या दोन्ही भागांच्या हिंदी आवृत्तीत प्रभासला आवाज दिला आहे. याशिवाय त्यानं 'आदिपुरुष' चित्रपटातही प्रभासला आवाज दिला आहे.

शरद केळकरचं वैयक्तिक आयुष्य : शरद केळकर वैयक्तिक जीवनाबद्दल बोलायचं झालं तर त्यानं 3 जून 2005 रोजी टीव्ही अभिनेत्री कीर्ती गायकवाडशी लग्न केलं. या दोघांनी 'नच बलिए 2' मध्ये देखील भाग घेतला होता.

हेही वाचा :

  1. Dhak Dhak title track Re Banjara out : दिया मिर्झा, फातिमा सना शेखसह महिलांची अनोख्या अवतारातील रोड ट्रीप
  2. Thank You For Coming X review: भूमी पेडणेकर आणि शहनाज गिलच्या सेक्स कॉमेडीने जिंकली प्रेक्षकांची मनं
  3. Tiger 3 trailer countdown start : 'टायगर 3' ट्रेलरसाठी उलटी गिनती सुरू, सलमान-कतरिनाच्या चाहत्यांची उत्सुकता शिगेला

Last Updated : Oct 7, 2023, 12:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.