मुंबई - अलिकडच्या काही वर्षात दाक्षिणात्य चित्रपटांनी हिंदी भाषिक प्रदेशातही जबरदस्त कामगिरी केली आहे. यात पुष्पा, केजीएफ, बाहुबली, आरआरआरचे हिंदी कलेक्शन थक्क करणारे होते. अलिकडे हिंदी चित्रपटही साऊथच्या भाषेत रिलीज होत असतात. मात्र हा प्रयोग अद्याप तरी यशस्वी झालेला नाही. हा अडथळा शाहरुखचा पठाण चित्रपट पार करेल असे वाटत होते. मात्र पठाणची कामगिरी साऊथमध्ये अपेक्षित झालेली दिसत नाही. पठाण देश विदेशात बंपर कमाई करत असला तरी, पण हिंदी आवृत्तीच्या तुलनेत दक्षिणेच्या बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची कमाई फारच कमी आहे.
कोरोनाच्या काळात हिंदी भाषिक प्रेक्षकांना साऊथच्या चित्रपटाबद्दलचे आकर्षण वाढले. काही टीव्ही चॅनल्स व ओटीटी प्लॅटफॉर्मवर साऊथचे डब केलेले हिंदी चित्रपट पाहायला मिळतात. त्यांचा प्रेक्षक वर्गही खूप मोठा आहे. दरम्यान बाहुबलीपासून साऊथच्या चित्रपटांची क्रेझ वाढली. त्यानंतर केजीएफचे दोन्ही भाग, पुष्पा, विक्रम, आरआरआर व कंतारा या चित्रपटांनी हिंदी प्रेक्षकांना थिएटरमध्ये खेचून आणले. उत्तरेकडील सिनेमागृहांमध्ये साऊथच्या चित्रपटांना चांगल्या संख्येने स्क्रीन्स मिळत आहेत. साऊथचे डब केलेले चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई करत आहेत. पण पठाणही दक्षिण भागात आपली क्षमता दाखवू शकला आहेत का? हे जाणून घेऊयात.
पठाण चित्रपटाची साऊथ भारतीय बॉक्स ऑफिसवरील कमाई - पुष्पा, केजीएफ, बाहुबली, विक्रम, कंतारा व आरआरआरचे हिंदी कलेक्शन थक्क करणारे होते. अनेक चित्रपटांनी कमाईचे रेकॉर्डही मोडले आहेत. पण पठाणची हीच जादू दक्षिणेतील सिनेमागृहांमध्ये चालली नाही. पठाण देश विदेशात बंपर कमाई करत असला तरी पण हिंदी आवृत्तीच्या तुलनेत दक्षिणेच्या बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची कमाई फारच कमी आहे.
दाक्षिणात्य थिएटरमध्ये शाहरुख खानच्या पठाण व्यतिरिक्त, पोंगल ( संक्रांत सण ) वर रिलीज झालेल्या दोन मोठ्या साऊथ स्टार्सचे चित्रपट आधीच बनले होते. तमिळ चित्रपट वारिसू आणि थुनिवू दक्षिण भारतीय बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करत आहेत. या दोन सिनेमांमधून पठाणला साऊथमध्ये कडवी टक्कर मिळाली आहे. हे शक्य आहे की वारीसू आणि थुनिवूने आधीच थिएटर्स व्यापल्यामुळे पठाणला दक्षिण भागात इच्छित स्क्रीन्स मिळू शकले नाहीत.
पठाण हा मूळचा हिंदीत रिलीज झाला आहे. त्याची डब केलेली आवृत्ती तामिळ आणि तेलुगूमध्ये रिलीज झाली आहे. पठाणला भारतात 5500 स्क्रीन आणि जगभरात 8000 स्क्रीन्स मिळाल्या. दक्षिणेकडील राज्यांमध्ये आपली मोहिनी गमावणाऱ्या बॉलीवूडला पठाणने आशेचा किरण दाखवला हे निश्चित.
पठाणचे भारतातील कलेक्शन 7 दिवसात 328.25 कोटी झाले आहे. आणि जगभरातील मार्केटमध्ये शाहरुखच्या चित्रपटाने 7 दिवसात 640 कोटींची कमाई केली आहे. पठाणने साऊथ बॉक्स ऑफिसवर 6 दिवसांत 10.75 कोटींची कमाई केली आहे.
पठाीण तेलुगु - 7.5 कोटी
पठाण तमिळ - 3.25 कोटी
KGF 2 (53.95 कोटी) आणि RRR (20.07 कोटी) या चित्रपटांनी पहिल्या दिवशी हिंदी आवृत्तीमध्ये जितकी कमाई केली तितकी कमाई पठाणला १० दिवसातही जमलेली नाही.
पहिला दिवस - हिंदी ५५ कोटी, तेलुगु १.५ कोटी, तमिळ - ०.५ लाख
दिवस 2 - हिंदी 68 कोटी, तेलुगु 1.75 कोटी, तमिळ - 0.75 लाख
दिवस 3 - हिंदी 38 कोटी, तेलुगु 0.85 लाख, तमिळ - 0.4 लाख
दिवस 4 - हिंदी 51.5 कोटी, तेलुगु 1.25 कोटी, तमिळ - 0.5 लाख
दिवस 5 - हिंदी 58.5 कोटी, तेलुगु 1.5 कोटी, तमिळ - 0.75 लाख
दिवस 6 - हिंदी 25.5 कोटी, तेलुगु 0.65 कोटी, तमिळ - 0.35 लाख
पठाणने साऊथ बॉक्स ऑफिसवर कमाई न करण्यामागे अनेक कारणे आहेत. पहिली गोष्ट म्हणजे शाहरुख खानचा चित्रपट पॅन इंडिया चित्रपट नव्हता. दक्षिणेतील फक्त दोन भाषांमध्ये तो रिलीज झाला आहे. पठाण कन्नड आणि मल्याळममध्ये डब केलेले नाहीत. अशा परिस्थितीत, कमाईचे आकडे केजीएफ, बाहुबली आणि आरआरआर सारख्या संपूर्ण भारतातील चित्रपटांपेक्षा कमी असणे शक्य आहे. पण कसेही असले तरी पठाणने आपली जादू देशभर केली आहे हे निश्चित.