ETV Bharat / entertainment

मुंबई विमानतळावर शाहरुख खान, अनुष्का शर्मा झाले स्पॉट, पाहा व्हिडिओ - Shah rukh Khan

Shah Rukh Khan And Anushka Sharma: अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा मुंबई विमानतळावर स्पॉट झाले. आता त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Shah Rukh Khan and Anushka Sharma
शाहरुख खान आणि अनुष्का शर्मा
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 17, 2023, 10:56 AM IST

मुंबई - Shah Rukh Khan And Anushka Sharma : अभिनेता शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी चित्रपट 'डंकी'च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. हा चित्रपट 21 डिसेंबरला थिएटरमध्ये दाखल होण्यासाठी सज्ज आहे. दरम्यान पापाराझीनं रविवारी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्रामवर किंग खान आणि अभिनेत्री अनुष्का शर्माचा व्हिडिओ पोस्ट केला. रविवारी पहाटे किंग खान आणि अनुष्का शर्मा विमानतळावर दिसले. किंग खानबद्दल बोलायचं झालं तर, किंग खान त्याच्या कारमधून खाली उतरत होता. यावेळी त्यानं आपला लूक कॅज्युअल ठेवल होतं. त्यानं नेव्ही ब्लू टी-शर्ट आणि जॅकेट कार्गो पॅन्ट परिधान केला होता. या लूकला आणखी सुंदर बनविण्यासाठी त्यानं काळ्या रंगाचा सनग्लास लावला होता.

अनुष्का शर्माचा व्हिडिओ व्हायरल : दुसरीकडे अनुष्का शर्मानं काळ्या रंगाची टी-शर्ट आणि जॅकेटसह पांढऱ्या रंगाचा पॅन्ट घातला होता. यावर तिनं केस मोकळी सोडली होती. यावेळी ती शॉर्ट हेअरकट आणि विंटर आउटफिटमध्ये खूपच सुंदर दिसत होती. प्रवेश करण्यापूर्वी अनुष्कानं पापाराझींना हात हलवून अभिवादन केलं. सध्या अनुष्का तिच्या बेबी बंपमुळे चर्चेत आहे. अनुष्का शर्माच्या या व्हिडिओवर अनेकजण कमेंट्स करत आहेत. एका चाहत्यानं या व्हिडिओवर लिहिल, ''अनुष्का तुझं लूक खूप सुंदर आहे''. दुसऱ्या एका चाहत्यानं लिहिलं, ''अनुष्का नक्कीचं कुठल्या तरी चित्रपटाच्या शूटला जात असेल''. आणखी एकानं लिहिलं, ''अतिशय सुंदर व्यक्ती''. अशा अनेक कमेंट्स या व्हिडिओवर येत आहेत. याशिवाय काहीजण या व्हिडिओवर फायर आणि हार्ट इमोजी पोस्ट करत आहेत.

वर्क फ्रंट : अनुष्का शर्मा आणि किंग खानच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती पुढे स्पोर्ट्स बायोपिक 'चकडा एक्सप्रेस' मध्ये दिसणार आहे. प्रोसित रॉय दिग्दर्शित हा चित्रपट क्रिकेटर झुलन गोस्वामीवर आधारित आहे. ती अखेर 'काला'मध्ये एका खास कॅमिओ भूमिकेत दिसली होती. दुसरीकडे शाहरुख खानचा 'डंकी' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याशिवाय तो 'पठान वर्सेज टाइगर 3' या चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटाची वाट अनेकजण आतुरतेन पाहत आहेत.

हेही वाचा :

  1. वर्ष 2023 'जमाल कुडू' ते 'झूमें जो पठाण' या वर्षातील 9 लोकप्रिय गाणी
  2. जॅकी श्रॉफ स्टारर 'हिरो' चित्रपटाला 40 वर्षे पूर्ण, कर्णमधुर बासरीच्या तालावर 'एक पिढी' आजही खुलते
  3. अबराम खाननं त्याच्या शाळेतील वार्षिक कार्यक्रमात वडील शाहरुख खानची सिग्नेचर पोझ दिली ; चाहत्यांनी केलं कौतुक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.