ETV Bharat / entertainment

Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि त्याच्या वडिलांचा पंजाबी लूक झाला व्हायरल... - शाहिद कपूरचे पगडी लूक

शाहिद कपूर त्याच्या डॅशिंग स्टाइलसाठी खूप लोकप्रिय आहे. शाहिदने सोशल मीडियावर नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तो वडील पंकज कपूर यांच्यासोबत पगडी घातलेला दिसत आहे.

Shahid Kapoor And Pankaj Kapoor
शाहिद कपूर आणि पंकज कपूर
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 29, 2023, 2:32 PM IST

मुंबई : शाहिद कपूर हा बॉलिवूडमध्ये टॉप अभिनेत्यापैकी एक आहे. शाहिदला चित्रपटसृष्टीत अभिनयासाठी आणि त्यांच्या चांगल्या लूकसाठी ओळखले जाते. 4 वर्षांपूर्वी आलेल्या 'कबीर सिंग' या चित्रपटाच्या यशानंतर शाहिदने एक उंच झेप घेतली. शाहिद हा सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. दरम्यान, आता मंगळवारी, शाहिदने आपल्या चाहत्यांसोबत काही खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये त्याच्यासोबत त्याचे वडील पंकज कपूर देखील दिसत आहे. शाहिदच्या फोटोमध्ये तो खूप वेगळ्या लूकमध्ये दिसत आहे. शाहिद आणि पंकज कपूर या फोटोत पगडीत दिसत आहे.

शाहिद आणि पंकज कपूरचे पगडी लूक : शाहिद पांढऱ्या रंगाच्या पगडीमध्ये तो खूप खास दिसत आहे. याशिवाय पंकज कपूरने देखील पांढऱ्या रंगाची पगडी घातली आहे. फोटोत शाहिद हा पंजाबी मुंडा दिसत असल्याने अनेक जण त्याचे कौतुक करत आहे. या फोटोंवर शाहिदने एक मजेशीर कॅप्शन देत लिहले, 'बाबा नेहमी म्हणतात की जर घरी लग्न असेल तर ते पग घालतील' असे त्याने फोटोवर लिहले आहे. त्याच्या या कॅप्शनवरून अंदाज लावला जाऊ शकतो की. तो त्याच्या कुटुंबातील एका सदस्याच्या लग्नाला गेला होता, ज्यासाठी त्याने हा सरदार लूक केला आहे. शाहिद कपूर हा पंजाबी कुटुंबातील आहे.

या चित्रपटात दिसणार शाहिद कपूर : शाहिद कपूरचा 'कबीर सिंग' हा चित्रपट रूपेरी पडद्यावर खूप जोरदार हिट झाला होता. त्यानंतर शाहिदचा 'जर्सी' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला. दरम्यान आता अलीकडेच शाहिदचे ओटीटीवरील 'फर्जी' या वेबसीरिजद्वारे डिजिटल पदार्पण छान झाले आहे. याशिवाय तो क्रिती सेननसोबत रोमँटिक चित्रपटात दिसणार आहे. दिग्दर्शक अमित जोशी यांच्या या चित्रपटाचे नाव अद्याप समोर आलेले नाही. हा चित्रपट दिनेश विजानच्या मॅडॉक फिल्म्सच्या बॅनरखाली बनवला जात आहे. या चित्रपटाबद्दल सध्या खूप चर्चा सोशल मीडियावर सुरू आहेत.

हेही वाचा :

The Archies gets release date : सुहाना खान, खुशी कपूर आणि अगस्त्य नंदाचा पहिला चित्रपट 'द आर्चीज'ची रिलीज तारीख जाहीर

kajol buys an office space : काजोलने मुंबईत खरेदी केले कोट्यावधीचे ऑफिस; जाणून घ्या किंमत...

king of kotha box office collection Day 5 : दुल्कर सलमान स्टारर 'किंग ऑफ कोठा'नं केली बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई....

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.