दोहा ( कतार ) - Shahid and Kiara dance on Jumma Chumma : बॉलिवूड तारे तारकांची मांदियाळी सध्या 'एंटरटेनर नंबर 1' या कार्यक्रमासाठी दोहा येथे अवतरली आहे. यामध्ये शाहिद कपूर, कियारा अडवाणी, वरुण धवन, टायगर श्रॉफ आणि जॅकलीन फर्नांडिस यांच्यासह अनेक बॉलिवूड स्टार्स प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी मेहनत घेत आहेत. त्यांच्या डान्स रिहर्सलमधील अनेक क्लिप आणि फोटो सध्या ऑनलाईन प्रसिद्ध झालेत. निःसंशयपणे हे सर्व व्हायरल व्हिडिओ बॉलिवूडवर प्रेम करणाऱ्या चाहत्यांसाठी एक प्रकारची पर्वणीच आहे. शाहिद कपूरनं त्याच्या इन्स्टाग्रामवर त्याच्या रिहर्सलमधील एक झलक शेअर केलीय. या व्हिडिओमध्ये तो मेगास्टार अमिताभ बच्चन यांचं लोकप्रिय गाणे 'जुम्मा चुम्मा'वर डान्स स्टेप्स करताना दिसतोय. या गाण्यामध्ये अनेक सहकलाकार त्याच्यासोबत रिहर्सल करताहेत आणि त्याची कबीर सिंग' चित्रपटातील सह-कलाकार कियारा अडवाणीही थिरकताना दिसतेय. या जोरदार रिहर्सलमध्ये शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी यांच्यासोबत वरुण धवन, टायगर श्रॉफ आणि जॅकलीन फर्नांडिसही उत्साहाने सामील झाल्याचं व्हिडिओत दिसतंय.
-
OMGGGG!🔥🤩 Shahid Kapoor - Kiara Advani for Doha, Qatar Entertainer No 1 🔥🤩#ShahidKapoor #KiaraAdvani pic.twitter.com/dhMTaRC52a
— ᏕᏬᏒᏰᏂᎥ ❤️ (@Its_Surbhi19) October 6, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">OMGGGG!🔥🤩 Shahid Kapoor - Kiara Advani for Doha, Qatar Entertainer No 1 🔥🤩#ShahidKapoor #KiaraAdvani pic.twitter.com/dhMTaRC52a
— ᏕᏬᏒᏰᏂᎥ ❤️ (@Its_Surbhi19) October 6, 2023OMGGGG!🔥🤩 Shahid Kapoor - Kiara Advani for Doha, Qatar Entertainer No 1 🔥🤩#ShahidKapoor #KiaraAdvani pic.twitter.com/dhMTaRC52a
— ᏕᏬᏒᏰᏂᎥ ❤️ (@Its_Surbhi19) October 6, 2023
दोहा येथील 'एंटरटेनर नंबर 1' या कार्यक्रमासाठी सुरू असलेल्या रिहर्सलमधील आणखी काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत. या व्हिडिओ क्लिपमध्ये शाहिद, वरुण आणि टायगर 'जब वी मेट' चित्रपटातील गाजलेल्या 'मौजा ही मौजा' गाण्याच्या ठेक्यावर ताल धरताना दिसताहेत.
शाहिद कपूरच्याअगोदर वरुण धवननेही त्याच्या इन्स्टाग्रामवर तीन ग्रुप फोटो शेअर केले आहेत. या फोटोत शाहिद कपूरसह टायगर, कियारा, जॅकलीन, रकुल प्रीत सिंग आणि इतर कलाकार अतिशय उत्साहात फोटोसाठी पोज देताना दिसतात. 'दोहा ताब्यात घेण्यासाठी लक्ष केंद्रीत केलेले आनंदी चेहरे. केवळ 5 दिवसात आम्ही एक रिंगण विकण्यात यशस्वी झालोय. आम्ही आता आमचं ह्रदय नाचवायला तयार आहोत', असं कॅप्शन शाहिदनं दिलंय.
टायगर श्रॉफनंही इंस्टाग्रामवर शाहिद आणि वरुणबरोबर रिहर्सलचा एक मजेदार व्हिडिओ शेअर केलाय. 'आमच्या रिहर्सलमध्ये थोडंसं डोकावून बघा...आज रात्री तिकीटांची हाऊसफुल्ल विक्री झालेल्या शोसाठी दोन सुपरस्टार्ससोबत नाचतोय. हम आ रहे है... 'एंटरटेनर नंबर 1' असं त्यानं लिहिलंय.
रकुल प्रीत सिंहनेही तिच्या इंस्टाग्रामवर एक रील शेअर केलीय. या व्हिडिओमध्ये रकुल, जॅकलिन आणि कियारा डान्स करताना आणि कार्यक्रमाची तयारी करताना दिसताहेत. या कार्यक्रमासाठी कॉमेडियन भारती सिंग आणि गायक किंगसह अनेक बॉलिवूड तारे-तारकाही दोहामध्ये आहेत.
हेही वाचा -
2. Thank You For Coming X Review: भूमी पेडणेकर आणि शहनाज गिलच्या सेक्स कॉमेडीने जिंकली प्रेक्षकांची मनं