ETV Bharat / entertainment

Swadesh Song viral : 'आदिपुरुष' वादात शाहरुख खानची एन्ट्री - आदिपुरुष वादात शाहरुख खानची एन्ट्री

'आदिपुरुष' या वादग्रस्त चित्रपटाची देशभरात चांगलीच धुळफेक होत आहे. दरम्यान, बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आता आदिपुरुष वादात उतरला असून तो लोकांना भगवान राम आणि रामायणाचा खरा अर्थ सांगत आहे.

Adipurush
आदिपुरुष
author img

By

Published : Jun 24, 2023, 3:51 PM IST

मुंबई : दिग्दर्शक ओम राऊत यांनी 600 कोटी रुपयांमध्ये आदिपुरुष हा चित्रपट तयार केला होता. पहिल्या टीझरपासून हा चित्रपट सैफ ​​अली खानच्या रावणाच्या लूकवरून वादात सापडला होता त्यानंतर आताही हा वाद सुरूच आहे. या चित्रपटात प्रभास राघवच्या भूमिके दिसला आहे तर क्रिती सेनॉन ही जानकीच्या भूमिकेत दिसली आहे. ओम राऊत आणि संवाद लेखक मनोज मुंतशीर यांचा हा प्रयत्न लोकांच्या घशातून उतरत नाही आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांनी नाकारले आहे. बॉक्स ऑफिसवर अवघ्या आठ दिवसांत हा चित्रपट संपत असल्याचे दिसत आहे.

देशभरात होत आहे विरोध : या चित्रपटाला देशभरातून विरोध होत असून सोशल मीडियावर युजर्स ओम राऊत आणि मनोज मुंतशीर शिव्या देत आहे. दरम्यान, ओम राऊत आणि मनोज मुनताशीर यांना राम आणि रामायणाचा खरा अर्थ सोशल मीडियावर सांगण्यासाठी एक गाणे सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. हे गाणे बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानच्या चित्रपटातील असून या चित्रपटाचे नाव स्वदेश आहे. सध्याला हे गाणे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.

यूजर्स ओम राऊतला शिव्या देत आहेत : 2004 मध्ये प्रदर्शित झालेल्या शाहरुख खानच्या स्वदेश चित्रपटातील गाणे शेअर करताना एका वापरकर्त्याने लिहिले की, या 50 सेकंदाच्या क्लिपने 500 कोटी रुपयांचा चित्रपट आदिपुरुषला खूप मागे टाकले. दुसर्‍या युजरने हे गाणे ट्विटरवर शेअर केले आणि लिहिले, '2004 मध्ये स्वदेशने रामायणाचा खरा अर्थ सांगितला आणि ओम राऊतने सर्वकाही नष्ट केले'. दरम्यान, आणखी एक ट्विटर वापरकर्त्याने लिहिले की, आदिपुरुषचे दिग्दर्शक ओम राऊत यांच्यापेक्षा स्वदेश चित्रपटाने रामायणाचे चांगले आणि चांगले वर्णन केले आहे. या गाण्याच्या क्लिवर अशाप्रकारच्या अनेक कमेंट येत आहे. आदिपुरुष चित्रपटाची चौफेर टीका होत आहे. चित्रपटावर होणाऱ्या टीकेमुळे चित्रपटाच्या कमाईत घसरण होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे खरचं हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ५०० कोटीची कमाई करेल का यावर आता एक शंकाच निर्माण झाली आहे.

हेही वाचा :

  1. Emergency teaser : राजकीय इतिहासातील सर्वात गडद काळ दाखवणारा इमर्जन्सीचा टीझर रिलीज
  2. kriti sanon Adipurush : क्रिती सेनॉनने स्वतःचे मनोरंजन करत केली एक पोस्ट...
  3. Sobhita Dhulipala on naga chaitanya : सामंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्यचे कौतुक करताना दिसली शोभिता धुलिपाला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.