मुंबई - बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानने नुकतीच फिल्म इंडस्ट्रीतील आपल्या कारकिर्दीची ३० वर्षे पूर्ण केली. यावेळी त्याने चाहत्यांचे आभार मानले आहेत. या संदर्भात अभिनेत्याने एक पोस्ट केली आहे. बॉलीवूडमध्ये 30 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शाहरुख खानच्या पठाण या चित्रपटाचे पोस्टरही समोर आले, जे चाहत्यांसाठी पर्वणीच ठरले.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
बॉलीवूडमधील कारकिर्दीची ३० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल शाहरुख खानने लिहिले की, "३० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप आभार, माझ्यासाठी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे मनोरंजनासाठी सेलिब्रेट करणे म्हणजे रात्रंदिवस काम करणे. तुम्हा सर्वांना प्रेम."
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
पठाण चित्रपटाच्या पोस्टरबद्दल बोलायचे तर शाहरुख खान एका हातात बंदूक घेऊन उभा आहे. शाहरुखचा हा लूक पाहून चाहत्यांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे. इन्स्टाग्रामवर मोशन पोस्टर शेअर करताना शाहरुखने लिहिले की, '३० वर्षे आणि आणखी मोजत नाही कारण तुमचे प्रेम आणि स्मित अमर्याद आहे. पठाण सोबत हा प्रवास चालू आहे. २५ जानेवारी २०२३ रोजी हा चित्रपट रिलीज होईल. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषेत प्रदर्शित होत आहे.''
त्याचबरोबर शाहरुखच्या या अप्रतिम पोस्टवर त्याचे चाहतेही तीव्र प्रतिक्रिया देत आहेत. 'पठाण'च्या या मोशन पोस्टरला आतापर्यंत 5 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. यावरून असे म्हणता येईल की शाहरुखचे चाहते त्याचा चित्रपट पाहण्यासाठी उतावीळ होऊन बसले आहेत. जॉन अब्राहम 'पठाण'मध्येही महत्त्वाच्या भूमिकेत आहे.
शाहरुखने 30 वर्षांपूर्वी केले होते पदार्पण - शाहरुख खानने 1992 मध्ये रिलीज झालेल्या राज कंवरच्या 'दीवाना' या चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटात त्याच्यासोबत दिव्या भारती आणि ऋषी कपूर मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला आणि पहिल्याच चित्रपटापासून शाहरुख खानचे नाणे बॉलिवूडमध्ये चालले होते.
हेही वाचा - प्रियंका निकच्या रोमँटिक बीच व्हेकेशनची झलक