ETV Bharat / entertainment

Shahrukh Khan And Anand Mahindra : नैसर्गिक संसाधन घोषित केल्याबद्दल शाहरुख खानने उद्योगपती आनंद महिंद्रा यांचे मानले आभार... - शाहरुख खानने आभार मानले

Shahrukh Khan And Anand Mahindra : उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी शाहरुख खानचं 'जवान' चित्रपटासाठी सोशल मीडियाद्वारे कौतुक केलं आहे. त्यानंतर किंग खान देखील आनंद महिंद्रा यांचे आभार मानले आहे. सध्या शाहरुखचा 'जवान' चित्रपट हा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.

Shahrukh Khan And Anand Mahindra
शाहरुख खान आणि आनंद महिंद्रा
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 9, 2023, 2:18 PM IST

मुंबई - Shahrukh Khan And Anand Mahindra : शाहरुख खाननं पुन्हा एकदा सिद्ध केलं की तो बॉलिवूडचा 'बादशाह' आहे. नुकताच प्रदर्शित झालेला 'जवान' चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करतोय. या चित्रपटानं पहिल्याच दिवशी चांगली ओपनिंग करत सर्वाधिक कमाईचा नवा विक्रम केला. हा चित्रपट 7 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला चाहत्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळतोय. या चित्रपटामध्ये शाहरुखचे जबरदस्त अ‍ॅक्शन सीन दाखविण्यात आले आहेत. अनेकजण शाहरुख खानचं कौतुक करतायत. दरम्यान आता 'बिझनेस टायकून' आनंद महिंद्रा यांनी देखील किंग खानचं भरभरून कौतुक केलं आहे.

आनंद महिंद्रा यांनी केलं शाहरुख खानचं कौतुक : उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी शाहरुख खानचा 'जवान' चित्रपट पाहिला. 'जवान'ला पाहिल्यानंतर आनंद महिंद्रा यांनी 'एक्स'वर एक पोस्ट केली. त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलं, सर्व देश त्यांच्या नैसर्गिक खनिज स्त्रोतांचे संरक्षण करते आणि खाणीचं खोदकाम करतात. सहसा परकीय चलन मिळविण्यासाठी त्यांची निर्यात देखील करतात. कदाचित 'एसआरके'ला नैसर्गिक संसाधन घोषित करण्याची वेळ आली आहे' यावर 'किंग खान'चे उत्तर देत म्हटलं, खूप खूप धन्यवाद. सिनेमा निर्मितीच्या बाबतीत माझ्या देशाला अभिमान वाटावा यासाठी मी माझ्या कुवतीप्रमाणे विनम्रतेने प्रयत्न करत राहतो आणि आशा आहे की एक 'नैसर्गिक संसाधन' प्नमाणे मर्यादित नाही! सर तुम्हाला बिग हग.'

'जवान' करत आहे बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई : 'जवान' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सध्या धमाल करतोय. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 74.5 कोटींची कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशी चित्रपटानं 50 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला. आतापर्यंत एकूण कलेक्शन 127.50 कोटी रुपयांवर पोहोचलंय. तसंच 'जवान' हा रूपेरी पडद्यावर 'पठाण'चं रेकॉर्ड मोडत बंपर ओपनर म्हणून उदयास आलाय. हा चित्रपट वीकेंडला मोठी कमाई करेल आणि लवकरच 500 कोटींच्या क्लबमध्ये दाखल होईल, अशी आशा व्यक्त केली जातेय. 'जवान' या चित्रपटाचं दिग्दर्शन अ‍ॅटली यांनी केलंय. 'जवान' चित्रपटातल्या अभिनयासाठी चित्रपटरसिक शाहरुख खान आणि नयनतारा जोडीवर प्रेमाचा वर्षाव करतायत.

हेही वाचा :

  1. Akshay Kumar Birthday: वाढदिवसानिमित्त बॉलीवूड स्टार अक्षय कुमारनं लावली महाकालेश्वर मंदिरात हजेरी....
  2. Mahesh Babu reviews Jawan : साउथ सुपरस्टार महेश बाबूनं पाहिला 'जवान'; शाहरुखचं केलं कौतुक...
  3. Asha Bhosle Birthday : चिरतरुण आवाजाच्या सदाबहार गायिका आशा भोसलेंचा वाढदिवस; गाण्यांच्या जादूनं जिंकलं जग...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.