Jawan trailer viewers reaction मुंबई - जवान चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर अत्यंत कमी वेळात लाखो प्रेक्षकांनी पाहून आपल्या उत्स्फुर्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. प्रेक्षकांना ट्रेलर खूप आवडल्याचे प्रतिक्रियावरुन दिसत आहे. ट्रेलर ज्याप्रकारे कथाकथन करतो ती पद्धत लोकांना खूप पसंत पडल्याचे जाणवतंय. मनोरंजनाचे सर्व घटक असलेला ट्रेलर शाहरुख खानच्या अॅक्शन हिरो प्रतिमेला उंचावणारा आहे. या चित्रपटातील डायलॉगही प्रेक्षकांना आवडल्याचे दिसतंय.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
मुंबईतील मेट्रो ट्रेन हायजॅक केलेला असताना व्हिलनच्या भूमिकेतील शाहरुखला विचारणा होते की, 'तुला अखेर काय हवं आहे?' त्यावर शाहरुख म्हणतो, 'चाहिए तो आलिया भट्ट..' हा संवाद प्रेक्षकांना खूप आवडल्याचे प्रतिक्रियावरुन दिसते. दुसऱ्या एका संवादात शाहरुख बोलतो, 'बेटे को हात लगाने से पेहले, बाप से बात कर' हा संवाद प्रेक्षक दुसऱ्या संदर्भात आवडल्याचे सांगत आहेत. हा डायलॉग शाहरुखने समीर वानखेडेला उद्देशन म्हटल्याचा मिश्किल दावा चाहत्यांनी केलाय.
'जवान' ट्रेलरमध्ये आणखी एक डायलॉग आहे, 'हम जवान है, अपनी जान हजार बार डाव पर लगा लकते है, लेकीन सिर्फ देश के लिए. तुम्हारे जैसे देश बेचने वालों के लिए हरगीज नही.' हा संवाद प्रेक्षकांच्या सर्वाधिक पसंतीस उतरल्याचे दिसतंय.
ट्रेलर पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी अनेक प्रतिक्रिया दिल्यात. त्यापैकी एक चाहता हिंदीत लिहितो, 'कुछ ट्रेलर अच्छे लगते है, कुछ ट्रेलर रोंगटे खड़े करते हैं। पर ये वो ट्रेलर हैं जिससे पूरी दुनियां की फिल्म इंडस्ट्रीज सीखती है की ट्रेलर होता क्या है? ये वो ट्रेलर है जिस पर हमे गर्व होता है।जवान लोग उम्र से नही कर्म से होते हैं।'
आणखी एकाने लिहिलंय, 'आजवर पाहिलेल्या सर्वोत्कृष्ट ट्रेलर पैकी सर्वात रोमांचक ट्रेलर. अखेरीस शाहरुख जे बेल्टने मारतो ते वरच्या स्तारवरचे आहे. इतर सगळी दृश्ये थिएटरमध्ये अनुभवताना टाळ्या वाजतील अशी खात्री आहे. गूजबंप्सचा अर्थ जवान आहे.' अशा अक्षरशः हजारो प्रतिक्रिया रेड चिलीज एंटरटेन्मेंटच्या इन्स्टाग्रामवर आणि यूट्यूब चॅनेलवर पाहायला मिळत आहेत. प्रत्येक क्षणाला पाहणाऱ्यांच्या गर्दीत हजारोंची भर पडत आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
हेही वाचा -
२. trailer of Jawan : 'जवान' चित्रपटाचा बहुप्रतीक्षित ट्रेलर रिलीज, शाहरुखच्या अॅक्शनसवर चाहते फिदा