ETV Bharat / entertainment

शाहरुख खानने वडोदरा स्टेशनवर आरओ प्लांटसाठी खर्चले 23 लाख रुपये - shah Rukh khan vadodara station

शाहरुख खानने वडोदरा रेल्वे स्थानकावर लाखो रुपये किमतीचा आरओ प्लांट बसवला आहे. यामुळे प्रवाशांना स्वच्छ पाण्याची सुविधा मिळू शकेल, असे वृत्त आहे.

शाहरुख खान
शाहरुख खान
author img

By

Published : Aug 2, 2022, 12:19 PM IST

मुंबई - बॉलिवूडचा 'बादशाह' शाहरुखबद्दल मोठी बातमी येत आहे. शाहरुख त्याच्या चित्रपटांव्यतिरिक्त सामाजिक कार्यासाठीही ओळखला जातो. आता असे वृत्त आहे की शाहरुख खानने वडोदरा रेल्वे स्थानकावर लाखो रुपयांचा आरओ प्लांट बसवला आहे, जेणेकरून प्रवाशांना स्वच्छ पाण्याची सुविधा मिळू शकेल.

मीडियानुसार, शाहरुख खानने या आरओ प्लांटसाठी 23 लाख रुपये खर्च केले आहेत. शाहरुख त्याच्या चित्रपटांव्यतिरिक्त चॅरिटी आणि सामाजिक कार्यासाठीही प्रसिद्ध आहे. शाहरुख खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो पठाण, डंकी आणि जवान या आगामी चित्रपटासाठी सध्या चर्चेत आहे.

याशिवाय शाहरुख खानही यावर्षी अनेक चित्रपटांमध्ये कॅमिओ करताना दिसणार आहे. ज्यामध्ये रणबीर कपूर आणि आलिया भट्ट स्टारर पहिला चित्रपट 'ब्रह्मास्त्र' असल्याचेही सांगितले जात आहे. याआधी शाहरुख दक्षिण अभिनेता आर माधवनच्या रॉकेट्री - द नंबी इफेक्ट या चित्रपटात कॅमिओ करताना दिसला होता.

शाहरुख खानचा पठाण हा चित्रपट २५ जानेवारी २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. त्याचबरोबर 'जवान' हा चित्रपटही पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. याशिवाय शाहरुख खान सध्या 'डंकी' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. अलीकडेच या चित्रपटाच्या लंडन येथील सेटवरील फोटो समोर आले आहेत. या चित्रपटात शाहरुख खानसोबत तापसी पन्नू पहिल्यांदाच दिसणार आहे.

हेही वाचा - बॉलिवूड २०२२ : रिलीजसाठी तयार असलेले बहुप्रतीक्षित चित्रपट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.