मुंबई - अनन्या पांडेची चुलत बहीण अलना पांडेच्या लग्नाची चर्चा अजूनही ताजी आहे आणि लग्नाच्या सोहळ्यातील व्हिडिओ व्हायरल होत आहेत. शाहरुख खानचा जोडप्याला प्रेमळ आणि उबदार मिठीत घेऊन आशीर्वाद देण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये अहान पांडे शाहरुख खान स्टारर 'येस बॉस' या चित्रपटातील लोकप्रिय आय एम द बेस्ट या गाण्यावर थिरकताना जबरदस्त दिसत आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
अहान पांडेला त्याच्यासमोर शाहरुखचे गाणे परफॉर्म करताना पाहणे ही एक व्हिज्युअल ट्रीट होती. पाहुण्यांनी इन्स्टाग्रामवर व्हिडिओ अपलोड केल्यानंतर, चाहत्यांनी त्यांचा उत्साह व्यक्त करण्यासाठी कमेंट सेक्शनमध्ये तोबा गर्दी केली. अहान पांडे नृत्य सादरीकरणाचा संपूर्ण व्हिडिओ वधू अलना पांडेने तिच्या यूट्यूब चॅनेलवर अपलोड केला आहे. अनन्या पांडेची चुलत बहिणी अलनाने, डान्स पार्टनर करण मेहतासोबत शाहरुखच्या गाण्यावर परफॉर्म करण्यासोबतच, चंकी पांडेच्या विश्वात्मा चित्रपटातील सात समुंदर पार वर अनन्या पांडेसोबतही डान्स केला. अहानने आय एम दे बेस्ट गाण्यावर सादरीकरण केले, तर पठाण अभिनेता शाहरुख खान प्रेक्षकांमध्ये उभा राहिला आणि हसत जोरदार दाद देत होता. पांढरा शर्ट आणि काळ्या पँटमध्ये अहान सुंदर दिसत होता. दुसरीकडे, शाहरुखने काळ्या रंगाचा कोट आणि पांढरा शर्ट असलेली पँट निवडली होती.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
दरम्यान, सलमान खानची भाची अलिझेह अग्निहोत्री, ही सलमानची बहीण अलविरा खान आणि निर्माता अतुल अग्निहोत्री यांची मुलगी आहे. अलिझेहदेखील या लग्नसोहळ्याला उपस्थित होती. अलनाच्या लग्नात अलिझेहने अब तो फॉरएव्हर गाण्यावर नृत्य केले. लवकरच ती रुपेरी पडद्यावर पदार्पण करणार आहे. नवोदित अभिनेत्री अलिझेह हस्तिदंती साडीत दिसत होती आणि तिने तिचे केस स्लीक पोनीटेलमध्ये बांधले होते. अलना पांडे ही चंकी पांडेचे सख्खे भाऊ चिक्की पांडे उर्फ अलोक शरद पांडे यांची मुलगी आहे. त्यांना अलना आणि अहान हे दोन अपत्ये आहेत. अलनाच्या लग्नाचा उत्सव गेल्या काही दिवसापासून धुमधमाक्यात सुरू होता. अलनाने परदेशी प्रियकर इव्होरसोबत लग्नगाठ बांधली.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">