ETV Bharat / entertainment

Dunki Movie : शाहरुख खानचा 'डंकी' सेटवरचा फोटो व्हायरल; पाहा फोटो - तापसी पन्नू

shahrukh khan : शाहरुख खानच्या 'डंकी'च्या सेटवरचा एक फोटो झाला व्हायरल आहे. या फोटोमध्ये तो 90च्या दशकातील लूकमध्ये दिसत आहे. त्याचा हा आगामी चित्रपट लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.

Dunki Movie
डिंकी चित्रपट
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 10, 2023, 12:04 PM IST

Updated : Oct 10, 2023, 1:11 PM IST

मुंबई - shahrukh khan : शाहरुख खान सध्या त्यांच्या 'जवान' चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. त्याचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त हिट ठरला. या चित्रपटानं एक इतिहास रचला आहे. सध्या तो 'जवान' चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. काल किंग खानला मिळालेल्या जीवे मारण्याच्या धमक्यांदरम्यान, महाराष्ट्र सरकारने त्याला वाय प्लस श्रेणीची सुरक्षा प्रदान केली आहे. दरम्यान आता किंग खानचा आगामी चित्रपट 'डंकी' हा खूप चर्चेत आहे. या चित्रपटाबाबत एक बातमी आता समोर आली आहे. शाहरुख खान आता 'डंकी'च्या शूटिंगमध्ये आहे. 'डंकी'च्या सेटवरील किंग खानचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये शाहरुख हा 90 च्या दशकामधील लूकमध्ये दिसत असल्याचं बोललं जात आहे.

Dunki Movie
डंकी चित्रपट

'डिंकी'च्या सेटवरचा फोटो : व्हायरल झालेल्या फोटोमध्ये किंग कान हा पांढरा टी-शर्ट मध्ये असून त्याच्या गळ्यात काळी माळ आहे. तसेच या लूकमध्ये किंग खान केस लांब दिसत आहे. त्याचा हा लूक 90 च्या दशकाशी जुळणार आहे. शाहरुखचा आगामी चित्रपट 'डंकी' 22 डिसेंबरला रुपेरी पडद्यावर रिलीज होणार आहे. या चित्रपटाची शुटिंग ही निम्म्याहून अधिक झाली आहे. आता या चित्रपटाचं अंतिम टप्प्यातील शुटिंग मुंबईत सुरू आहे. 2018 मध्ये 'झिरो' हा चित्रपट सुपरफ्लॉप झाल्यानंतर किंग खानचं करिअर संपले असं सर्वजण मानत होते, मात्र 'पठाण' रिलीज झाल्यानंतर या चित्रपटानं जगभरात प्रचंड कमाई केली होती.

'डंकी'मध्ये शाहरुख खानसोबत तापसी पन्नू : 'पठाण'नं जगभरात 1000 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला. 'डंकी' हा चित्रपट 'मुन्नाभाई एमबीबीएस' फेम दिग्दर्शक राजकुमार हिरानी बनवत आहेत. या चित्रपटात शाहरुख खानसोबत तापसी पन्नू दिसणार आहे. याआधी, 'डंकी'च्या सेटवरील एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये शाहरुख हा अभिनेत्री तापसीला हात धरून घेऊन जाताना दिसला होता. हा व्हिडिओ काश्मीरमध्ये शूटिंग दरम्यात घेण्यात आला होता. सेटवरून लीक झालेले फोटो पाहून शाहरुखचे चाहते खूप आनंदी झाले आहेत. या चित्रपटाची वाट चाहते खूप आतुरतेनं पाहात आहे. 'पठाण' आणि 'जवान'प्रमाणेच डंकीची रिलीजपूर्वी हवा निर्माण झाली आहे.

हेही वाचा :

  1. Rekha Birthday : सदाबहार 'खूबसूरत' रेखाचा रिल आणि रियल लाईफमधला खडतर प्रवास
  2. Ekta kapoor : एकता कपूरला 'थँक यू फॉर कमिंग' या चित्रपटासाठी अनेकांनी केलं ट्रोल....
  3. Vidya Balan breaks silence : व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विद्या बालनने 'मुलगी' असल्याच्या दाव्यावर सोडले मौन

Last Updated : Oct 10, 2023, 1:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.