ETV Bharat / entertainment

आयरा खानच्या वेडिंग रिसेप्शनला लावली हजेरी, शाहरुख खानसह 'या' सेलिब्रिटींनी लावली हजेरी - नुपूर शिखरे

Ira Khan-Nupur Shikhare Wedding Reception : आयरा खान आणि नुपूर शिखरे यांच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये शाहरुख पत्नी गौरी खानसोबत पोहोचला होता. या पार्टीमध्ये सलमान खान, कतरिना कैफ, रणबीर कपूर, सीएम एकनाथ शिंदेही हजर होते.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 14, 2024, 11:15 AM IST

मुंबई - Ira Khan-Nupur Shikhare Wedding Reception : अभिनेत्री आमिर खानची लाडकी मुलगी आयरा खाननं अलीकडेच प्रियकरसोबत नुपूर शिखरेसोबत राजस्थानमधील उदयपूर येथे 10 जानेवारी रोजी ख्रिश्चन रितीरिवाजांनुसार लग्न केलं. दरम्यान मुंबईत 13 जानेवारी झालेल्या लग्नाच्या रिसेप्शनला चित्रपटसृष्टीतील तसेच राजकीय जगतातील अनेक स्टार्सनी हजेरी लावली होती. शाहरुख खान पत्नी गौरी खानसह या ग्रँड रिसेप्शनमध्ये पोहोचला होता. दरम्यान या लग्नातील काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याशिवाय या लग्नाच्या रिसेप्शनला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अभिनेता सलमान खान यांनीदेखील हजेरी लावली.

शाहरुख खानसह गौरी खान दिसली पार्टीत : या पार्टीत शाहरुख खान काळ्या रंगाच्या आउटफिटमध्ये दिसला होता, तर गौरी खानने लाल बिंदीसह रेड कलरचा आउटफिट घातला होता. यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. याशिवाय पार्टीमध्ये सलमान खान ब्लॅक आउटफिटमध्ये खूपच डॅशिंग दिसत होता. आयरा आणि नुपूर शिखरे यांच्या लग्नाच्या रिसेप्शनला पोहोचलेल्या कलाकारांनी आमिर खानसोबत पोझ देऊन फोटो काढली. सलमान खान-शाहरुख खान, सीएम एकनाथ शिंदेसोबत रणबीर कपूर, शहनाज गिल, कतरिना कैफ, माधुरी दीक्षित आणि तिचा पती श्रीराम नेने आणि इतर कलाकारांनीही मुंबईत झालेल्या आयरा-नूपूरच्या वेडिंग रिसेप्शनला हजेरी लावली होती.

आयरा आणि नुपूरच्या लग्नातील व्हिडिओ व्हायरल : या पार्टीत रेखा, हेमा मालिनी, भूमी पेडणेकर, मृणाल ठाकूर, तापसी पन्नू यांच्यासह इतर स्टार्सही नवविवाहित जोडप्याला शुभेच्छा देण्यासाठी आले होते. आयरा आणि नुपूर शिखरेचं लग्न खूप चर्चेत आहे. या जोडप्यानं त्यांच्या लग्नातील अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल माडियावर पोस्ट केले होते. आयरा आणि नुपूरच्या लग्नातील एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये आमिर खान आणि त्याची पुर्वाश्रमीची पत्नी किरण राव डान्स करताना दिसले होते. याशिवाय आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये आयरा ही मेहंदी लावताना दिसली होती.

हेही वाचा :

  1. 'गुंटूर कारम' बनला महेश बाबूच्या करिअरमधील सर्वात मोठा ओपनिंग करणार चित्रपट
  2. प्रवाशांसह मुंबई विमानतळावर एरोब्रिजमध्ये तासंतास अडकली राधिका आपटे, वाचा काय घडलं
  3. सेन्सॉर संमत 'अन्नपूर्णी' ओटीटीवरुन काढून टाकल्या नंतरही फिल्म इंडस्ट्रीचे मौन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.