मुंबई - Shah Rukh khan spotted : अभिनेता शाहरुख खान 16 जानेवारीच्या रात्री त्याची मॅनेजर पूजा ददलानीसोबत स्पॉट झाला. पापाराझीची 'किंग खान'वर नजर गेल्यानंतर ते फोटो काढण्यास समोर आले असता त्यानं पापाराझींकडे दुर्लक्ष केलं. शाहरुख यावेळी हुडीसह निळ्या रंगाचा जीन्स परिधान केला होता. यावेळी त्यानं हुडी कॅपनं आपला चेहरा लपवला होता. शाहरुख खानच्या बॉडीगार्डनं तो कारमध्ये बसेपर्यंत काळी छत्री त्याच्या चेहऱ्यासमोर ठेऊन शाहरुखची छायाचित्रं घेता येणार नाहीत, याची तजवीज केली आणि नंतर तो कारपर्यंत गेला. यावेळी शाहरुखला त्याच्या चाहत्यांनी घेरलं होते. शाहरुख हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर यूजर्सच्या कमेंट्सही येत आहेत.
किंग खानवर केला चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव : या व्हिडिओवर एका चाहत्यानं कमेंट करत लिहिलं, ''शाहरुखची एक झलक भेटणं हे खूप कठीण आहे.'' दुसऱ्या एका चाहत्यानं लिहिलं, ''मला किंग खान खूप आवडतो, खरचं हा बॉलिवूडचा बादशाह आहे.'' आणखी एकानं लिहिलं, ''शाहरुख येण्याची एंट्री ही खूप खास आहे.'' या व्हिडिओमध्ये शाहरुखचे चाहते त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत. याशिवाय काहीजण या व्हिडिओवर हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करत आहेत. शाहरुख खान हा शेवटी राजकुमार हिराणीच्या 'डंकी' चित्रपटामध्ये दिसला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाला.
शाहरुख खानचं वर्कफ्रंट : 'डंकी' 21 डिसेंबर 2023 रोजी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर सुमारे 500 कोटी रुपये कमवले. 2023 मध्ये शाहरुख खानचा हा सलग तिसरा हिट चित्रपट आहे. शाहरुख खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर 2023 मध्ये 'पठाण', 'जवान' आणि 'डंकी' सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट दिल्यानंतर तो 'टाइगर वर्सेस पठान' या चित्रपटामध्ये सलमान खानबरोबर दिसणार आहे. या चित्रपटाची वाट आता अनेकजण पाहत आहेत. 'टाइगर वर्सेस पठान'मध्ये किंग खान आणि भाईजान अॅक्शनमोडमध्ये दिसतील. याशिवाय तो सुजॉय घोष निर्मित मुलगी सुहाना खानबरोबर झळकेल असं बोललं जात आहे.
हेही वाचा :