मुंबई - बॉलिवूडची डान्सिंग क्वीन मलायका अरोरा आणि गुरु रंधावा यांचे नवीन गाणे तेरा की ख्याल अखेर रिलीज झाले आहे. आप जैसा कोई गाण्याच्या अपग्रेडेड व्हर्जनने प्रेक्षकांच्या मनावर घट्ट बसवल्यानंतर, मलायकाने पुन्हा एकदा आणखी एका हिट नंबरने इंटरनेटवर तुफान माजवले आहे. दरम्यान, पापाराझींनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, मलायका एका चाहत्याने गाण्याच्या लॉन्चच्या वेळी सेल्फीची विनंती केल्यावर ती थक्क झालेली दिसली.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
पापाराझींचा सेल्फीसाठी आग्रह - मलायकाचा व्हिडिओ एका पापाराझीने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. तेरा की ख्याल गाण्याच्या लाँचच्या व्हायरल क्लिपमध्ये मलायका एक छोटासा अस्वस्थ क्षण अनुभवत आहे. व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना एका सोशल मीडिया युजरने लिहिले, 'दीदी डर गई'. दुसर्या यूजरने लिहिले, 'ती नेहमीप्रमाणेच ड्रामा क्वीन आहे. कोणीतरी सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत असताना तिला कशाची भीती वाटते?'. युजर्स काहीही म्हणत असले तरी गर्दीमध्ये गेल्यानंतर अनेक सेलेब्रिटींना खूप वाईट अनुभवांचा सामना करावा लागतो. काही वेळा तर वाईट पद्धतीने स्पर्श करणे, दाबणे, ढकलणे असे प्रकारही घडतात. त्यामुळे शक्यतो सेलेब्रिटी अशी गर्दी टाळताना दिसतात. मलायका अरोरानेही हेच केले. मलायकाचा बचाव करताना तिच्या एका चाहत्याने कमेंट केली, 'ती येथे तिच्या अंगरक्षकांशिवाय आहे. आणि गर्दीत हे उघड आहे की कोणीही तिला वाईट पद्धतीने स्पर्श करू शकतो. ही एक दुर्दैवी परिस्थिती आहे जी महिलांसोबत घडते, मग ती सेलिब्रिटी असो किंवा नॉन-सेलिब्रेटी. म्हणूनच ती थोडी अस्वस्थ असावी.'
तेरा की ख्याल गाण्यात मलायका - तेरा की ख्याल या गाण्यात मलायका काही मंत्रमुग्ध करणाऱ्या पोशाखात गायक-अभिनेता गुरू रंधावासोबत उत्साही ट्यूनवर नृत्य करताना दिसते. गाण्यात, अभिनेत्री मलायका ब्लॅक कट-आउट बॉडीसूट परिधान केलेली दिसत असून यावर तिने मॅचिंग क्रॉप टॉपसह जोडलेल्या गोल्डन फ्रिंज-स्लिप स्कर्टमध्ये बदल केला. गाण्याच्या अगदी शेवटी, ती सिल्वर कलरच्या पोशाखात खूपच सुंदर दिसली
हेही वाचा - Hrithik Roshan Picture : सबा आझादची सँडल हृतिक रोशनच्या हातात, फोटोमुळे इंटरनेटवर धुमाकूळ